शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

नागपूर जिल्ह्यातील खुर्सापार सीमेवर ३३ किलो चांदीची भांडी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 9:34 PM

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या खुर्सापार सीमेवर महसूल विभागाच्या पथकाने एका कारमधून ३३ किलो चांदीची भांडी जप्त केली. सोमवारी दुपारी ३.३० वाजता ही कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देमहसूल पथकाची कारवाई : पडताळणी सुरू

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर (सावनेर) : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या खुर्सापार सीमेवर महसूल विभागाच्या पथकाने एका कारमधून ३३ किलो चांदीची भांडी जप्त केली. सोमवारी दुपारी ३.३० वाजता ही कारवाई करण्यात आली.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर सावनेर विधानसभा क्षेत्रातील सीमावर्ती भागात महसूल विभागाचे निगराणी पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकाने खुर्सापार नाक्यावर मध्य प्रदेशातून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या मारुती कार क्रमांक एम.पी.०९/डब्ल्यू.सी.०१७१ ची तपासणी केली. यात गाडीत बसलेल्या दोघांजवळ तीन पिशव्यात चांदीची भांडी आढळून आली. यात चांदीचा प्याला, दिवा अशी पूजेची भांडी होती. या भांड्याची राजस्थान येथून खरेदी करण्यात आली आहे. इंदूर येथून ही भांडी नागपूर येथील बाजारात विक्रीला नेण्यात येत होती. नाकोडा ज्वेलर्स, इंदूरचा हा माल असल्याची माहिती त्या दोघांनी पथकातील अधिकाऱ्यांना दिली. पथकाने याप्रकरणी चिराग जैन याच्यासह त्याच्या सहकाऱ्याला ताब्यात घेतले. ही भांडी मिश्रित चांदीची असल्याची माहिती त्यांनी दिली. याचे बाजारभाव मूल्य ९ लाख ६० हजार रुपये असल्याचे सांगितले. सदर प्रकरणाची माहिती कळताच सावनेरचे तहसीलदार दीपक कारंडे, नायब तहसीलदार सतीश मासाळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या दोघांना चांदीच्या भांड्यासह तहसील कार्यालयात आणले. जप्त करण्यात आलेला माल सावनेर येथील कोषागारात जमा करण्यात आला असून, या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांना विचारणा केली असता सदर प्रकरणाची चौकशी सुरुअसल्याचे सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSilverचांदी