शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

पेंच प्रकल्पासाठी ३०० कोटी

By admin | Updated: March 2, 2016 03:11 IST

पेंच प्रकल्प व कन्हान बॅरेज कोच्छी प्रकल्प हे नागपूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचे प्रकल्प आहेत.

मंत्रिमंडळाचा निर्णय : पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार नागपूर : पेंच प्रकल्प व कन्हान बॅरेज कोच्छी प्रकल्प हे नागपूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचे प्रकल्प आहेत. नागपूर शहराचा होत असलेला विकास व भविष्यातील शहराची पाण्याची गरज विचारात घेता पेंच प्रकल्पासाठी तीन वर्षात ३०० कोटींची तरतूद करण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पेंच प्रकल्प व कन्हान बॅरेज कोच्छी प्रकल्पाकडे मंत्रिमंडळाचे लक्ष वेधले होते.शहर व जिल्ह्याचा विकास होत आहे. नवीन मोठमोठे प्रकल्प उभे राहात आहेत. या सोबतच शहराची लोकसंख्या वाढत असल्याने भविष्यात पिण्याचे पाणी, औद्योगिक क्षेत्र व शेतीसाठी पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.पेंच प्रकल्पासाठी ३०० कोटी तर कोच्छी प्रकल्पासाठी १७० कोटींचा निधी मिळणार असल्याने या प्रकल्पातील विविध प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण होतील. बॅरेजच्या उजव्या बाजूकडील उर्ध्व आणि निम्न भागातील गार्डवाल, डिवाइड वाल आणि किवाल याचे काम पूर्ण झाले आहे. बॅरेजच्या १६ ब्लागपैकी ६ ब्लॉगचे ८० टक्के काम करण्यात आले आहे उभ्या पद्धतीच्या १६ दरवाजाचे फेब्रिकेशनचे काम पूर्ण झाले आहे. बॅरेजचे पुढील काम मार्गी लागण्यासाठी निधीची गरज होती. यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नामुळे शहर व जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्यात वाढ होईल. तसेच शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्याला मदत होणार आहे. (प्रतिनिधी)कोच्छी प्रकल्पासाठी १७० कोटी सावनेर तालुक्यातील कन्हान नदीवर बॅरेज कोच्छी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे सावनेर तालुक्यातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहीत करण्यासाठी १७० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे सावनेर तालुक्यातील सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. कन्हान नदी मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येताना या नदीवर कोणत्याही स्वरुपाचा बंधारा नाही. त्यामुळे कोच्छी प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात सिंचनाची सुविधा होणार आहे. शहर व जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सुटेलमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेंच प्रकल्पासाठी ३०० कोटी तर कोच्छी प्रकल्पासाठी १७० कोटी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहर व जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न मिटेल. भविष्यातही पाण्याची अडचण जाणार नाही. तसेच जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. तसेच शहरात उभ्या राहात असलेल्या मोठ्या प्रकल्पांसाठी जमीन उपलब्ध करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. या बाबत शहरातील जनतेच्यावतीने त्यांचे स्वागत करतो.प्रवीण दटके, महापौर