शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

२७ टक्के स्त्रियांना मधुमेहाचा धोका

By admin | Updated: April 7, 2016 03:01 IST

अयोग्य जीवनशैली, व्यायामाचा अभाव व तणावामुळे नागपुरात २७ टक्के स्त्रियांना मधुमेहाचा धोका आहे.

उपराजधानीतील सर्वेक्षणाचा निष्कर्ष : २५ ते ३५ वयोगटातील लोकांमध्ये ‘टाईप २’ नागपूर : अयोग्य जीवनशैली, व्यायामाचा अभाव व तणावामुळे नागपुरात २७ टक्के स्त्रियांना मधुमेहाचा धोका आहे. स्थूलपणाच्या ७० टक्के प्रकरणांपैकी २० ते २२ टक्के लोकांना मधुमेह होण्याची शक्यता असते. परिणामी, हृदयविकार व हृदयाघातामध्ये ७-८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे एका सर्वेक्षणातून सामोर आले आहे. ७ एप्रिल हा जागतिक आरोग्यदिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) यावर्षी ‘सवय आरोग्यदायी जीवनशैलीची, वाट रोखेल मधुमेहाची’, हे ब्रीदवाक्य दिले आहे. याला घेऊन ‘इंडस हेल्थ प्लस’ने फेब्रुवारी २०१५ ते २०१६ या कालावधीमध्ये १७,६४७ लोकांच्या प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करून घेतल्या. यात हे वास्तव समोर आले आहे. इंडस हेल्थ प्लसचे प्रीव्हेन्टिव्ह हेल्थकेअर स्पेशालिस्ट अमोल नायकवाडी यांनी सांगितले की, या सर्वेक्षणातून नागपूरमधील पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये मधुमेहाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. मधुमेहाचा त्रास फक्त प्रौढ व्यक्तींनाच नव्हे तर तरुण व्यक्तींनाही होताना दिसतो आहे. नियमित आणि वेळच्यावेळी तपासणी करून घेतल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो. मधुमेहाची लक्षणे, लवकरात लवकर करून घेतलेले निदान याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याकरिता शासनाने विशेष धोरण राबविणे आवश्यक असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.