राज्य पोलीस दलात २७ नवे उपअधीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 21:39 IST2018-09-08T21:38:29+5:302018-09-08T21:39:36+5:30

राज्य पोलीस दलात उपअधीक्षक म्हणून निवड झालेल्या २७ नवीन अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आहे. हे सर्व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मंगळवार, ११ सप्टेंबरपासून राज्य पोलीस दलात विविध जिल्ह्यात रुजू होणार आहे. पोलीस महासंचालनालयातून तसे आदेश ७ सप्टेंबरला जारी झाले आहे.

27 new DySP in state police force | राज्य पोलीस दलात २७ नवे उपअधीक्षक

राज्य पोलीस दलात २७ नवे उपअधीक्षक

ठळक मुद्देपोलीस अकादमीत प्रशिक्षण अंतिम टप्प्यात : मंगळवारपासून रुजू होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य पोलीस दलात उपअधीक्षक म्हणून निवड झालेल्या २७ नवीन अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आहे. हे सर्व परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मंगळवार, ११ सप्टेंबरपासून राज्य पोलीस दलात विविध जिल्ह्यात रुजू होणार आहे. पोलीस महासंचालनालयातून तसे आदेश ७ सप्टेंबरला जारी झाले आहे.
थेट सेवा भरतीत निवड झालेल्या पोलीस उपअधीक्षकांना आधी महाराष्ट पोलीस अकादमी नाशिक येथे विशेष प्रशिक्षण दिले जाते. एक वर्षांचा हा प्रशिक्षण कालावधीत असतो. यानंतर त्यांना विविध जिल्ह्यात प्रात्यक्षिक प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. ते पूर्ण झाल्यानंतरच त्यांना पोलीस दलात ठिकठिकाणी रुजू करून घेतले जाते. नाशिकच्या पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेत असलेल्या २७ परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षकांचा प्रशिक्षण कालावधी १० सप्टेंबर २०१८ ला पूर्ण होणार असून, लगेच दुसºया दिवशी त्यांना विविध ठिकाणी प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी रुजू व्हावे लागणार आहे. तसे आदेश पोलीस महासंचालनालयातून ७ सप्टेंबरला जारी झाले आहे. या २७ उपअधीक्षकांपैकी एक अधिकारी नागपूर ग्रामीणला तर ८ अधिकारी विदर्भाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात ११ सप्टेंबरला रुजू होणार आहेत.

विदर्भात रुजू होणारे उपअधीक्षक
नागपूर ग्रामीण - कुणाल शंकर सोनवणे, अकोला - नीलेश विश्वासराव देशमुख, अमरावती ग्रामीण - जयदत्त बबन भवर, यवतमाळ - सुदर्शन पाटील, वाशिम - सुनील सुरेश पाटील, बुलडाणा - सुरेश अप्पासाहेब पाटील, भंडारा- स्वप्नील जाधव, वर्धा - भाऊसाहेब कैलास ढोले आणि चंद्रपूर - अमोल अशोक मांडवे.

Web Title: 27 new DySP in state police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.