आजपासून शहरात धावणार २५० शहर बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:53 IST2021-02-05T04:53:27+5:302021-02-05T04:53:27+5:30
पुन्हा ८० बस सुरू करण्याला मंजुरी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनपाच्या परिवहन विभागाला पुन्हा ८० शहर बस सुरू ...

आजपासून शहरात धावणार २५० शहर बस
पुन्हा ८० बस सुरू करण्याला मंजुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपाच्या परिवहन विभागाला पुन्हा ८० शहर बस सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. मंगळवारपासून शहरातील रस्त्यावर २५० शहर बस धावतील. शनिवारी ३० तर सोमवारी ५० बस सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आले. त्यानंतर आयबीटीएम ऑपरेटर डिम्टसने बसच्या मार्गाचे शेड्यूल जारी केले.
सोमवारी ५० बस सुरू करण्याचे आदेश काढले. यात ३० स्टॅण्डर्ड, १५ मिडी व ५ मिनी बसचा समावेश आहे. यावरून प्रशासनाने परिवहन समितीने मंजुरी दिलेल्या १०० बसमध्ये प्रशासनाने २० बस कमी केल्या आहेत. शहर बससेवा टप्प्याटप्प्याने सुरू केली जात आहे. आता शाळा, महाविद्यालये सुरू झालेली आहेत. अशा परिस्थितीत बसची संख्या वाढविणे गरजेचे आहे.