नागपुरातील २५ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 22:01 IST2018-07-25T22:00:19+5:302018-07-25T22:01:29+5:30
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण तोडण्याची मोहीम नासुप्रने सुरू ठेवली आहे. बुधवारी नासुप्रच्या पूर्व विभाग पथकाने २५ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली.

नागपुरातील २५ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण तोडण्याची मोहीम नासुप्रने सुरू ठेवली आहे. बुधवारी नासुप्रच्या पूर्व विभाग पथकाने २५ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केली.
सभापती अश्विन मुद्गल यांच्या निर्देशानुसार व अधीक्षक अभियंता (मुख्यालय) सुनील गुज्जलवार यांच्या नेतृत्वात नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यक्षेत्रातील शासकीय व निमशासकीय, सार्वजनिक जागेवरील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यात आली. पथकाने कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डिफेन्स कॉलनीतील नागराज मंदिर, डिप्टी सिग्नल मधील बजरंग मंदिर, डिप्टी सिग्नल शितलामाता मंदिर जवळील शिव मंदिर, डिप्टी सिग्नल,सेवाराम शाहू यांचे घराजवळील शिव मंदिर, बाजार चौक, डिप्टी सिग्नल येथील राम मंदिर, संतोषीमाता नगरातील संतोषी माता मंदिर, शिव मंदिर, गिल्लारे गेट जवळील उडता हनुमान मंदिर, नाग मंदिर, गोपाल नगरातील गुरुदेव राम मंदिर, हनुमान मंदिर, बडा देव, बाजार चौकातील दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर तोडण्यात आले.
नंदवन पोलीस स्टेशन अंतर्गत संघर्ष नगरातील दोन शिव मंदिर, हनुमान मंदिर, जयस्तंभ, श्रावण नगरील नाग मंदिर, वाठोडा घाट येथील हनुमान मंदिर, सूरज नगरातील दुर्गा मंदिर,हनुमान मंदिर व गणेश मंदिर, भांडेवाडी डम्पिंग यार्ड रोडवरील हनुमान मंदिर, गणेश मंदिर, सूरज नगरातील पंचशील ध्वज, श्रावण नगर,वाठोडा येथील सय्यद साहब ध्वज, गजानन नगर हॅरिसन लॉन येथील सार्वजनिक नागोबा मंदिराचे अतिक्रमण काढण्यात आले. कारवाईदरम्यान स्थानिक नागरिकांनी नासुप्रच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केले. सकाळी १० वाजता सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कार्यवाही पूर्व विभागातील कार्यकारी अभियंता संजय चिमूरकर, विभागीय अधिकारी(पूर्व) भरत मुंडले, कनिष्ठ अभियंता अविनाश घोगले, दीपक धकाते, नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख मनोहर पाटील व कळमना आणि नंदनवन पोलीस विभागाच्या नेतृत्वात करण्यात आली.