25 lakh jewelry was stolen from a bungalow in Nagpur | नागपुरात  बंगल्यातून २५ लाखाचे दागिने उडवले
नागपुरात  बंगल्यातून २५ लाखाचे दागिने उडवले

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर :चोरांनी सोनेगाव येथील सहकारनगर स्थित एका प्रॉपर्टी डीलरच्याबंगल्यातून २५ लाखाचे दागिने लंपास केले. पोलीस सूत्रानुसार प्रॉपर्टी डीलर मिलिंद जोशी सहकारनगरातील करुणेश्वर मंदिराजवळ राहतात. ते ४ नोव्हेंबर रोजी रात्री कुटुंबासह बहिणीच्या घरी मुंबईला गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी खिडकीचे ग्रील तोडून बंगल्यात प्रवेश केला आणि आलमारीच्या लॉकरमध्ये ठेवलेले ८६५ ग्राम सोन्याचे दागिने लंपास केले. लॉकरची चावी सुद्धा घरीच होती. चोरांनी सहजपणे रोख ७० हजार व दगिन्यावर हात साफ केला. ११ नोव्हेंबर रोजी रात्री जोशी नागपूरला आले. यानंतर त्यांना चोरी झाल्याचे समजले.

Web Title: 25 lakh jewelry was stolen from a bungalow in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.