शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
6
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
7
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
9
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
10
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
11
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
12
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
13
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
14
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
15
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
16
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
17
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
18
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
19
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
20
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

नागपूरमार्गे धावणाऱ्या  २३ रेल्वेगाड्या धुक्यामुळे ‘लेट’, ३ रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 10:30 PM

दिल्लीकडील भागात दाट धुके पसरल्यामुळे या मार्गावरील रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. बुधवारी २३ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा ३ ते १७ तास उशिराने धावल्या, तर ३ रेल्वेगाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रेल्वेगाड्यांची वाट पाहत प्रवाशांना वेटिंग रूममध्ये बसून राहण्याची पाळी आली.

ठळक मुद्देप्रवाशांची गैरसोय : वेटिंग रूम फुल्ल

आॅनलाईन लोकमतनागपूर : दिल्लीकडील भागात दाट धुके पसरल्यामुळे या मार्गावरील रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. बुधवारी २३ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा ३ ते १७ तास उशिराने धावल्या, तर ३ रेल्वेगाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रेल्वेगाड्यांची वाट पाहत प्रवाशांना वेटिंग रूममध्ये बसून राहण्याची पाळी आली.बुधवारी रेल्वे प्रशासनाने २२८८५ लोकमान्य टिळक टर्मिनस-टाटानगर एक्स्प्रेस, ५१८२९ नागपूर-इटारसी एक्स्प्रेस आणि ५१२८६ नागपूर-भुसावळ या तीन गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. तर उशिराने येणाऱ्या  रेल्वेगाड्यात १२२७० निजामुद्दीन-चेन्नई एक्स्प्रेस १७ तास, १२४१९ निजामुद्दीन-रायगड गोंडवाना एक्स्प्रेस १६ तास, १८२३६ अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्स्प्रेस १५.१५ तास, १२६५२ निजामुद्दीन-मदुराई ७ तास, २२४१६ निजामुद्दीन-विशाखापट्टणम ४.५० तास, १२८०८ हजरत निजामुद्दीन-विशाखापट्टणम स्वर्णजयंती एक्स्प्रेस ७ तास, १२५२१ बरौनी-एर्नाकुलम राप्तीसागर एक्स्प्रेस १५ तास, १२६२६ नवी दिल्ली-त्रिवेंद्रम ४.३० तास, १२१६० जबलपूर-अमरावती ४ तास, १६३१८ श्रीमाता वैष्णोदेवी कटरा-इरोड जंक्शन हिमसागर एक्स्प्रेस १४.३० तास, १२७२४ दिल्ली-हैदराबाद १३.३० तास, २२९६२ निजामुद्दीन-सिकंदराबाद ८ तास, १५०२३ गोरखपूर-यशवंतपूर एक्स्प्रेस ७.१५ तास, १२७९२ दानापूर-चेन्नई एक्स्प्रेस २.३० तास, १२६१६ दिल्ली-चेन्नई एक्स्प्रेस ९.४५ तास, १२४०९ रायगड-निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस १० तास, १२६२२ दिल्ली-चेन्नई एक्स्प्रेस ४.३० तास, १६३६० पटना-एर्नाकुलम एक्स्प्रेस ६ तास, १२२९६ दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेस ३ तास, १२५७७ बागमती-म्हैसूर एक्स्प्रेस ५.३० तास, १२५२५ त्रिवेंद्रम-दिल्ली एक्स्प्रेस २ तास, १२८०७ विशाखापट्टणम-निजामुद्दीन स्वर्णजयंती एक्स्प्रेस १.३० तास आणि १२८०४ हजरत निजामुद्दीन-विशाखापट्टणम २ तास या गाड्यांचा समावेश होता. उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्यांना ताटकळत रेल्वेस्थानकावर बसून राहण्याची पाळी आली. यामुळे रेल्वे स्थानकावरील वेटिंग रूम फुल्ल झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात गर्दीउशिराने येणाऱ्या  रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांनी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात गर्दी केली. यात अनेक प्रवाशांनी आपली गाडी येण्यास उशीर असल्यामुळे दुसऱ्या  गाडीने प्रवास करण्याची परवानगी उपस्टेशन व्यवस्थापकांकडून घेतली.

 

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरTrafficवाहतूक कोंडी