शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

वैज्ञानिकाच्या लॉकर्समध्ये आढळले २३ लाख

By admin | Updated: March 13, 2015 02:40 IST

लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात अडकलेले गोकुळपेठ येथील भारतीय मानक ब्युरोचे ‘क’ श्रेणीचे वैज्ञानिक बिपीन वीरेंद्र जांभूळकर यांच्या दोन लॉकर्समध्ये २३ लाख रुपये रोख ...

नागपूर : लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात अडकलेले गोकुळपेठ येथील भारतीय मानक ब्युरोचे ‘क’ श्रेणीचे वैज्ञानिक बिपीन वीरेंद्र जांभूळकर यांच्या दोन लॉकर्समध्ये २३ लाख रुपये रोख आणि मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने आढळून आले. त्यामुळे सीबीआय अधिकाऱ्यांनी त्यांना गुरुवारी पुन्हा सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.एस. मुरकुटे यांच्या न्यायालयात हजर करून, त्यांचा १६ मार्चपर्यंत वाढीव पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. हिंगणघाट येथील उद्योजक आणि वर्धा येथील बाबूजी अ‍ॅक्वा कंपनीचे मालक अशफाक अली उस्मान अली यांच्याकडून ९ मार्च रोजी १५ हजाराची लाच घेताना सापळा रचून जांभूळकर यांना रंगेहात अटक करण्यात आली होती. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची ही कंपनी होती. या कंपनीला भारतीय मानक ब्युरोचा परवाना होता. एप्रिल २०१४ मध्ये या कंपनीच्या परवान्याची मुदत संपली होती. त्यामुळे या कंपनीचा एकूण व्यवहार बंद झाला होता. भारतीय मानक ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीवर धाड घालून आकस्मिक पाहणी केली होती. त्यात ही कंपनी बंद असल्याचे निदर्शनास आले होते. या कंपनीच्या गैरप्रकाराच्या संदर्भात भारतीय मानक ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी फौजदारी कारवाई करून वर्धा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात खटला भरला होता. २० डिसेंबर २०१४ रोजी खटल्याचा निकाल लागून अशफाक अली हे निर्दोष ठरले होते. वैज्ञानिक बिपीन जांभूळकर यांनी अशफाक अली यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाच्याविरुद्ध अपील दाखल करण्याची तसेच हे प्रकरण दिल्लीपर्यंत नेण्याची धमकी देऊन ५० हजाराच्या लाचेची मागणी केली होती. सौदेबाजी होऊन १५ हजार रुपये घेत असताना जांभूळकर यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या निवासस्थानाच्या तसेच बँक खाते व लॉकर्सच्या झडतीत मोठ्या प्रमाणावर माया आढळून आली. त्यांची अचल संपत्ती हुडकून काढली जात आहे. तपासासाठी वाढीव पोलीस कोठडी मागण्यात आली. न्यायालयात सीबीआयचे विशेष वकील ए.एच. खान यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)