नागपूरमध्ये आरटीओला २२८ कोटींचे उत्पन्न; ग्रामीणचे १०० टक्के लक्ष्य पूर्ण
By सुमेध वाघमार | Updated: April 9, 2023 18:25 IST2023-04-09T18:24:48+5:302023-04-09T18:25:58+5:30
नागपूर ग्रामीण आरटीओ विभागांतर्गत गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा हे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येतात.

नागपूरमध्ये आरटीओला २२८ कोटींचे उत्पन्न; ग्रामीणचे १०० टक्के लक्ष्य पूर्ण
नागपूर : वाहनांशी संबंधित विविध कामांच्या माध्यमातून मिळणाºया उत्पन्नात नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) नवा उच्चांक गाठला आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात आरटीओने २२८ कोटींचे उत्पन्न प्राप्त केले आहे.
वाहनसंख्येच्या प्रमाणात वाहनधारकांकडून होणारे नियमभंग, तसेच लायसन्स व रजिस्ट्रेशन अशा विविध करांपोटी कोट्यवधी रु पयांचा महसूल जमा करणाºया ह्यआरटीओह्ण कार्यालयात पायाभूत सोयींचा वानवा आहे. मात्र, त्याकडे डोळेझाक करत राज्याकडून महसुलाचे ह्यटार्गेटह्ण न विसरता वाढवून दिले जाते . नुकतेच सरलेले आर्थिक वर्षदेखील त्याला अपवाद नव्हते. नागपूर ग्रामीण आरटीओला २२८ कोटींचे लक्ष्य देण्यात आले होते. कार्यालयाने विशेष परिश्रम घेत १०० टक्के लक्ष्य गाठण्यात यश मिळविले. विशेष म्हणजे, मागील वर्षी २०७ कोटी ६४ लाखांचे लक्ष्य असताना १९० कोटी ४७ लाख म्हणजे ९२ टक्केच उद्दीष्ट गाठता आले.
नागपूर विभागात ५२३ कोटींचा महसूल जमा
नागपूर ग्रामीण आरटीओ विभागांतर्गत गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा हे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येतात. नागपूरसह या चारही उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मिळून ५२३ कोटी ११ लाखांचे लक्ष्य देण्यात आले होते. त्या तुलनेत ९५ टक्के म्हणजे, ४९४ कोटी ३६ लाखांचे लक्ष्य साध्य करण्यात यश आले. मागील वर्षी ४७७ कोटी २९ लाखांचे लक्ष्य असताना ८७ टक्के म्हणजे ४१५ कोटी उद्दीष्ठ गाठता आले.
अथक प्रयत्नांमुळेच अव्वल
महसूलाच्या बाबतीत नागपूर ग्रामीण आघाडीवर आहे. कार्यालयातील सर्व अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक व कर्मचाºयांच्या अथक प्रयत्नातून १०० टक्के महसूल प्राप्त करून अव्वल क्रमांक कायम राखणे शक्य झाले.
-विजय चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण