२२ हजार नळ कनेक्शन ‘डिस्कनेक्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:24 IST2020-12-04T04:24:38+5:302020-12-04T04:24:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. निधीअभावी प्रभागातील विकास कामे थांबली आहेत. दुसरीकडे पाणी बिलाची ...

२२ हजार नळ कनेक्शन ‘डिस्कनेक्ट’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. निधीअभावी प्रभागातील विकास कामे थांबली आहेत. दुसरीकडे पाणी बिलाची १९७.६४ कोटींची थकबाकी आहे. यात वर्षानुवर्षे थकबाकी न भरणाऱ्यांचाही समावेश आहे. ९९ कोटी ९ हजारांची थकबाकी असलेल्या २१ हजार ९७७ ग्राहकांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
नागपूर शहरात ३ लाख ६० हजारांच्या आसपास पाणी ग्राहक आहेत. जुनी थकबाकी वगळता २०२०-२१ या वर्षात १७५ कोटी पाणी बिल वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी नोव्हेंबर अखेरीस ९२.४० कोटींची वसुली झाली होती तर यावर्षी याच कालावधीत ९६.५१ कोटींची वसुली झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत वसुली ४ कोटी ११ लाखांनी अधिक आहे तर १ लाख ७८ हजार ३४७ ग्राहकांकडे चालू वर्षाची ९८. ५४ कोटींची थकबाकी आहे.
....
मोठ्या प्रमाणात अवैध न कनेक्शन
नागपूर शहराला दररोज ६७५ एमलडी पाणी पुरवठा होतो. परंतु मोठ्या प्रमाणात अवैध कनेक्शन आहेत. यामुळे अपेक्षित वसुली होत नाही. अशा ग्राहकांना नोटीस बजावून अवैध नळ डिस्कनेक्ट करण्याची मोहीम मनपाच्या जलप्रदाय विभागाने हाती घेतली आहे.
....
मोठ्या थकबाकीदारांचाही समावेश
पाणी बिलाची वर्षानुवर्षे थकबाकी असणाऱ्यांत मोठ्या थकबाकीदारांचाही समावेश् आहे. यात शासकीय कार्यालये, व्यावसायिक, प्रतिष्ठाने आदींचा समावेश आहे. मनपाने पाणीबिल न भरणाऱ्या शहरातील ग्राहकांसाठी गतकाळात थकबाकीची ५० टक्के माफीची योजना आणली होती. परंतु योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
....
थकबाकी वसुलीसाठी मोहीम
वर्षानुवर्षे पाणी बिल न भरणाऱ्या थकबाकीदारांकडील वसुलीसाठी मनपाने मोहीम हाती घेतली आहे. दंडात्मक कारवाई करून नळजोडणी डिस्कनेक्ट करण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी सर्व झोनमध्ये कारवाई केली जात आहे. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी थकबाकी भरावी.
- विजय झलके, स्थायी समिती अध्यक्ष व जलप्रदाय समिती सभापती