शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

तान्हा पोळ्याला २११ वर्षांचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:49 IST

तान्हा पोळा विदर्भ वगळता कुठेही साजरा करण्यात येत नाही. १८०६ साली श्रीमंत राजे रघुजी राजे भोसले (द्वितीय) यांनी लाकडी बैलांचा हा उत्सव सुरू केला.

ठळक मुद्देमुलांना संस्कृतीचे महत्त्व कळावे म्हणून सुरू झाली परंपरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तान्हा पोळा विदर्भ वगळता कुठेही साजरा करण्यात येत नाही. १८०६ साली श्रीमंत राजे रघुजी राजे भोसले (द्वितीय) यांनी लाकडी बैलांचा हा उत्सव सुरू केला. लहान मुलांना बैलाचे महत्त्व कळावे म्हणून ही परंपरा त्यांनी सुरू केली. या परंपरेला यंदा २११ वर्षे पूर्ण झाली आहेत.राजे रघुजी राजे भोसले यांनी लाकडी बैल तयार करून मागविले आणि सर्व लहान मुलांना ते वितरित केले. या बैलांना जिवंत बैलाप्रमाणे सजविण्यात आले. आंब्याचे तोरण लावून जिलेबी, फळे, चॉकलेट, बिस्कीट बांधण्यात आले. लाकडी बैलांची पूजा करून पूजा संपल्यावर तोरण तोडायचे आणि हनुमान खिडकीमार्गे हनुमानाचे दर्शन घेऊन मुलांना खाऊ द्यायचा, अशी ही प्रथा होती. तेव्हापासून विदर्भात ही प्रथा पाळण्यात येत आहे. मुधोजी राजे भोसले यांनीही ही प्रथा आजतागायत कायम ठेवली आहे. मुधोजी राजे भोसले यांच्या वाड्यात सर्वात मोठा लाकडी बैल आहे. मुधोजीराजेयांचे निवासस्थान सिनियर भोसला पॅलेस, महाल येथे आजही हा बैल ठेवण्यात आला आहे. या बैलाची उंची आठ फूट तर लांबी सहा फूट आहे. बैलाच्या पायात चांदीचा तोडा आहे. ज्या पद्धतीने रघुजी राजे बैलाची वाजतगाजत मिरवणूक काढायचे त्याच पद्धतीने आजही मिरवणूक काढली जाते. याशिवाय शहरात विविध ठिकाणी तान्हा पोळ्यानिमित्त विविध मिरवणुका, वेशभूषा स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे.आज मारबत मिरवणूकनागपूरची परंपरा झळकणारविदर्भाचे सांस्कृतिक वैभव समजली जाणारी मारबत आणि बडग्याची मिरवणूक मंगळवारी सकाळी निघणार आहे. या मिरवणुकीत काळी व पिवळी मारबतसोबतच मासूरकर चौक, लालगंज, प्रेमनगर, फुकटनगर, पिवळीनदी, इतवारी, लालगंज, खैरीपुरा, नंदनवन झोपडपड्डी भागात तयार करण्यात आलेले बडगेही निघणार आहेत. दीडशे वर्षांपासून सुरू असलेली ही मारबतची परंपरा पोळ्याचे खास आकर्षण असते. मारबत पाहण्यासाठी मध्य प्रदेश व मराठवाड्यासह वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक शहरात येत असतात. पूर्वी ब्रिटिश सरकारच्या अन्यायाला विरोध करण्याच्या उद्देशाने मारबत शहरात फिरत असे. आता विविध सामाजिक अपप्रवृत्तींचा विरोध करण्याचे मारबत हे एक प्रतीक झाले आहे. मारबत आणि बडग्याच्या मिरवणुकीच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर यथार्थ टीका केली जाते. यंदाही ही परंपरा कायम असणार आहे. यंदा महागाई, भ्रष्टाचारासह चिनी वस्तूवर बहिष्कार, भूमाफिया आदींचेही बडगे निघणार आहेत. मंगळवारी काळी मारबत व पिवळी मारबतची नेहरू पुतळा चौक येथे भेट होईल. हे विहंगम दृश्य डोळ्यात साठविण्यासाठी नागपूरकर येथे गर्दी करणार आहेत.