सासऱ्याकडे गेलेल्या व्यक्तीचे १.९७ लाखाचे दागीने लंपास
By दयानंद पाईकराव | Updated: February 19, 2024 20:37 IST2024-02-19T20:36:15+5:302024-02-19T20:37:27+5:30
नागपूर : घराला कुलुप लाऊन सासऱ्याच्या घरी गेलेल्या व्यक्तीच्या घरातील १.९७ लाखाचे सोन्याचे दागीने अज्ञात आरोपीने पळविले. ही घटना ...

सासऱ्याकडे गेलेल्या व्यक्तीचे १.९७ लाखाचे दागीने लंपास
नागपूर : घराला कुलुप लाऊन सासऱ्याच्या घरी गेलेल्या व्यक्तीच्या घरातील १.९७ लाखाचे सोन्याचे दागीने अज्ञात आरोपीने पळविले. ही घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी १७ फेब्रवारीला दुपारी ४ ते रविवारी १८ फेब्रुवारीला सकाळी १० वाजताच्या दरम्यान घडली.
अभिषेक प्रदीपकुमार देशपांडे (२९, रा. एनआयटी मैदानाजवळ, गोपालकृष्णनगर) हे आपल्या घराला तसेच गेटला कुलुप लाऊन सीए रोड येथे आपल्या सासऱ्याकडे गेले होते. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. आरोपीने बेडरुममधील लोखंडी आलमारीतील सोन्याचे मंगळसुत्र, हार, अंगठ्या, टॉप्स व चांदीचे दागीने असा एकुण १ लाख ९७ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. देशपांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.