आईकडे गेलेल्या महिलेचे लॉकरसह १.६९ लाखांचे दागीने लंपास
By दयानंद पाईकराव | Updated: January 6, 2024 16:06 IST2024-01-06T16:05:44+5:302024-01-06T16:06:03+5:30
ही घटना मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी ३० डिसेंबर २०२३ ते ४ जानेवारी २०२४ दरम्यान घडली.

आईकडे गेलेल्या महिलेचे लॉकरसह १.६९ लाखांचे दागीने लंपास
नागपूर : घराला कुलुप लाऊन आईच्या घरी गेलेल्या महिलेच्या घरातील आलमारीत ठेवलेले लॉकर आणि सोन्या-चांदीचे दागीने असा एकुण १.६९ लाखांचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने पळविला. ही घटना मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी ३० डिसेंबर २०२३ ते ४ जानेवारी २०२४ दरम्यान घडली.
सोनाली सुरेंद्र शुक्ला (वय ३३, रा. कार्तीकी नटराज सोसायटी, गोरेवाडा) या आपल्या घराला कुलुप लाऊन अवस्थीनगर येथे आपल्या आईच्या घरी गेल्या होत्या. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. आरोपीने आलमारीत ठेवलेले लॉकर व त्यातील सोन्या-चांदीचे दागीने असा एकुण १ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक नितीन वाघुळे यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.