शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

मध्य रेल्वेच्या अभियंत्याकडे १.६२ कोटींची अघोषित संपत्ती, सीबीआय, एसीबीकडून गुन्हा दाखल

By योगेश पांडे | Published: January 03, 2023 9:01 PM

Crime News: वेकोलिच्या अधिकाऱ्यावर कारवाईचे प्रकरण ताजेच असताना नागपूर सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मध्य रेल्वेच्या सहायक विभागीय अभियंत्याविरोधात अघोषित संपत्तीच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

- योगेश पांडे नागपूर -  वेकोलिच्या अधिकाऱ्यावर कारवाईचे प्रकरण ताजेच असताना नागपूर सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मध्य रेल्वेच्या सहायक विभागीय अभियंत्याविरोधात अघोषित संपत्तीच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. अवध बिहारी चतुर्वेदी असे संबंधित अभियंत्याचे नाव असून २०१६ ते २०२२ या कालावधीत १.६२ कोटींची अघोषित संपत्ती जमविल्याचा आरोप आहे.

अवध बिहारी चतुर्वेदीला १९९४ मध्ये मध्य रेल्वेत कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाल्यावर पहिली पोस्टिंग जळगाव येथील वरणगाव येथे देण्यात आली होती. त्यानंतर पदोन्नती झाल्यावर भुसावळ व नागपूर येथे सहायक विभागीय अभियंता (दक्षिण) या पदावर कार्य केले. २०१६ ते मार्च २०२२ या कालावधीत चतुर्वेदीने उत्पन्नाच्या तुलनेत जास्त मालमत्ता व वस्तू खरेदी केल्या. उत्पन्न व खरेदीचे गुणोत्तराचे गणित बसत नव्हते व सीबीआयच्या प्राथमिक चौकशीत ही संपत्ती भ्रष्टाचारातून प्राप्त केल्याची बाब समोर आली. चतुर्वेदीने या कालावधीत १ कोटी ६२ लाख ८६ हजार ८७५ रुपयांची अघोषित मालमत्ता जमविली. या कालावधीत चतुर्वेदीचे उत्पन्न ७४ लाख १९ हजार इतके होते. उत्पन्नापेक्षा ही मालपत्ता २१९ टक्क्यांनी अधिक होती. सीबीआयने चौकशीनंतर चतुर्वेदीविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

इंदोरमध्ये घर, लॉकरमध्ये ५० लाखांचे दागिनेचतुर्वेदीकडे २०१५ च्या अगोदर ८६ लाख ८९ हजारांची संपत्ती होती. तर २०१६ ते २०२२ या कालावधीत हा आकडा २ कोटी ७२ लाखांवर पोहोचला. अवैधरित्या कमविलेल्या पैशांतून इंदोर येथील महालक्ष्मी नगर येथे एक घरदेखील खरेदी केले. २०१५ च्या अगोदर चतुर्वेदीकडे इंदोरमध्येच एक घर व एक फ्लॅट होते. इंदोर येथील बॅंक लॉकरमध्ये ५० लाखांचे दागिने आढळले. तर घरी ६० लाखांची रोकड आढळली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीblack moneyब्लॅक मनी