मध्य रेल्वेच्या अभियंत्याकडे १.६२ कोटींची अघोषित संपत्ती, सीबीआय, एसीबीकडून गुन्हा दाखल

By योगेश पांडे | Published: January 3, 2023 09:01 PM2023-01-03T21:01:02+5:302023-01-03T21:01:29+5:30

Crime News: वेकोलिच्या अधिकाऱ्यावर कारवाईचे प्रकरण ताजेच असताना नागपूर सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मध्य रेल्वेच्या सहायक विभागीय अभियंत्याविरोधात अघोषित संपत्तीच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

1.62 crore undeclared assets of Central Railway engineer, CBI, ACB file a case | मध्य रेल्वेच्या अभियंत्याकडे १.६२ कोटींची अघोषित संपत्ती, सीबीआय, एसीबीकडून गुन्हा दाखल

मध्य रेल्वेच्या अभियंत्याकडे १.६२ कोटींची अघोषित संपत्ती, सीबीआय, एसीबीकडून गुन्हा दाखल

googlenewsNext

- योगेश पांडे 
नागपूर -  वेकोलिच्या अधिकाऱ्यावर कारवाईचे प्रकरण ताजेच असताना नागपूर सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मध्य रेल्वेच्या सहायक विभागीय अभियंत्याविरोधात अघोषित संपत्तीच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. अवध बिहारी चतुर्वेदी असे संबंधित अभियंत्याचे नाव असून २०१६ ते २०२२ या कालावधीत १.६२ कोटींची अघोषित संपत्ती जमविल्याचा आरोप आहे.

अवध बिहारी चतुर्वेदीला १९९४ मध्ये मध्य रेल्वेत कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाल्यावर पहिली पोस्टिंग जळगाव येथील वरणगाव येथे देण्यात आली होती. त्यानंतर पदोन्नती झाल्यावर भुसावळ व नागपूर येथे सहायक विभागीय अभियंता (दक्षिण) या पदावर कार्य केले. २०१६ ते मार्च २०२२ या कालावधीत चतुर्वेदीने उत्पन्नाच्या तुलनेत जास्त मालमत्ता व वस्तू खरेदी केल्या. उत्पन्न व खरेदीचे गुणोत्तराचे गणित बसत नव्हते व सीबीआयच्या प्राथमिक चौकशीत ही संपत्ती भ्रष्टाचारातून प्राप्त केल्याची बाब समोर आली. चतुर्वेदीने या कालावधीत १ कोटी ६२ लाख ८६ हजार ८७५ रुपयांची अघोषित मालमत्ता जमविली. या कालावधीत चतुर्वेदीचे उत्पन्न ७४ लाख १९ हजार इतके होते. उत्पन्नापेक्षा ही मालपत्ता २१९ टक्क्यांनी अधिक होती. सीबीआयने चौकशीनंतर चतुर्वेदीविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

इंदोरमध्ये घर, लॉकरमध्ये ५० लाखांचे दागिने
चतुर्वेदीकडे २०१५ च्या अगोदर ८६ लाख ८९ हजारांची संपत्ती होती. तर २०१६ ते २०२२ या कालावधीत हा आकडा २ कोटी ७२ लाखांवर पोहोचला. अवैधरित्या कमविलेल्या पैशांतून इंदोर येथील महालक्ष्मी नगर येथे एक घरदेखील खरेदी केले. २०१५ च्या अगोदर चतुर्वेदीकडे इंदोरमध्येच एक घर व एक फ्लॅट होते. इंदोर येथील बॅंक लॉकरमध्ये ५० लाखांचे दागिने आढळले. तर घरी ६० लाखांची रोकड आढळली होती.

Web Title: 1.62 crore undeclared assets of Central Railway engineer, CBI, ACB file a case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.