भिलाईहून दररोज १४० टन ऑक्सिजन येणार : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 22:07 IST2021-04-27T22:02:25+5:302021-04-27T22:07:05+5:30
Nitin Gadkari , oxygen will come from Bhilai सद्यस्थितीत विदर्भाला २०० टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. त्यातील १४० टन ऑक्सिजन भिलाईहून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय शुक्रवारपासून वर्धा येथे रेमडेसिविरच्या उत्पादनाला सुरुवात होणार असून, आठवडाभरात ३० हजार डोस मिळतील, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नागपुरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

भिलाईहून दररोज १४० टन ऑक्सिजन येणार : नितीन गडकरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सद्यस्थितीत विदर्भाला २०० टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. त्यातील १४० टन ऑक्सिजन भिलाईहून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय शुक्रवारपासून वर्धा येथे रेमडेसिविरच्या उत्पादनाला सुरुवात होणार असून, आठवडाभरात ३० हजार डोस मिळतील, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नागपुरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
भिलाई स्टील प्लान्टहून नागपूरला अगोदर ६० टन ऑक्सिजनचा कोटा मिळाला होता. आता तो आकडा ११० टनवर गेला आहे. शिवाय सेलनेदेखील ३० टन ऑक्सिजन देण्याची तयारी दाखविली असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
महाराष्ट्रालादेखील करणार रेमडेसिविरचा पुरवठा
वर्धा येथे शुक्रवारपासून रेमडेसिविरचा प्रकल्प सुरू होणार आहे. पुढील शुक्रवारपर्यंत ३० हजार डोस तयार होतील. अगोदर नागपूर व विदर्भात डोसचे वाटप होईल व त्यानंतर महाराष्ट्रातील इतर भागांना याचा पुरवठा करण्यात येईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
तिसरी लाट येईल हे गृहित धरून तयारी
दुसरी लाट अनपेक्षितपणे आली. अनेक सुविधांचा अभाव असल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. मात्र आता ऑक्सिजन, रेमडेसिविरचा पुरवठा सुरळीत होतो आहे. बेड्सदेखील वाढविले जातील. तिसरी लाट येईल हे गृहित धरूनच तयारी केली पाहिजे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.