शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

१३ वर्षीय मुलावर वर्गमित्राकडून चाकूने वार; नागपूरच्या सेंटर पाॅईंट शाळेतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2022 16:05 IST

दोन्ही मुले एकाच वर्गातील आहेत. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते मैदानावर सुटीच्या वेळी खेळत असताना काही किरकोळ कारणावरून त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर एका मुलाने त्याच्या वर्गमित्रावर स्विस चाकूने वार केले.

नागपूर : दाभा येथील सेंटर पाॅईंट शाळेत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने त्याच्या वर्गमित्रावर चाकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. ही घटना बुधवारी शाळा परिसरातच घडली. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.

घटनेचा तपास गिट्टीखदान पोलीस करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना शाळेच्या मैदानात घडली असून कोणत्याही पक्षाने तक्रार दाखल केली नसली तरी त्याचा तपास करण्यात येत आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पीआय बापू ढेरे यांनी सांगितले, दोन्ही मुले एकाच वर्गातील आहेत. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते मैदानावर सुटीच्या वेळी खेळत असताना काही किरकोळ कारणावरून त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर एका मुलाने त्याच्या वर्गमित्रावर स्विस चाकूने वार केले.

शिक्षकांनी जखमी विद्यार्थ्याला खासगी रुग्णालयात नेले. त्याच्या पालकांना कळविल्यावर त्यांनीही हॉस्पिटल गाठले. सुदैवाने मुलाला गंभीर दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन कसाड यांनी हा विषय गंभीर असल्याने आम्ही हल्ला करणाऱ्या मुलाला तात्पुरते निलंबित केले असल्याचे सांगितले. रुग्णालयामार्फत मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरSchoolशाळाStudentविद्यार्थी