शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

१३७ कोटी एसपीव्हीच्या खात्यात वळते करणार

By admin | Updated: March 3, 2017 02:19 IST

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहराला केंद्र व राज्य शासनाकडून १३७ कोटी रुपये मिळाले आहेत.

स्मार्ट सिटी योजना : पारडी, पुनापूर व भरतवाडा भागाचा विकासनागपूर : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहराला केंद्र व राज्य शासनाकडून १३७ कोटी रुपये मिळाले आहेत. ही रक्कम नागपूर स्मार्ट सिटीसाठी तयार करण्यात आलेल्या नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कापोर्रेशन या एसपीव्हीच्या खात्यात वळती करून ही रक्कम स्मार्ट अ‍ॅन्ड सेफ सिटीसाठी वापरण्यात येणार आहे. नागपूर शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश केल्यानंतर केंद्र सरकारने २०१६ -१७ या आर्थिक वर्षासाठी नागपूर महापालिकेला ९२ कोटी रुपये मंजूर केले. ही रक्कम राज्य शासनाकडे प्रलंबित होती. राज्य शासनाने केंद्राने मंजूर केलेल्या रकमेसह स्वत:चा ५० टक्के वाटा म्हणजेच ४५ कोटी रुपयेही एसपीव्हीला उपलब्ध केले आहेत. सध्या हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयात असून एक- दोन दिवसांत ही रक्कम एसपीव्हीच्या खात्यात वळती करण्यात येणार आहे. के ंद्र सरकारचे स्मार्ट सिटीसाठी ९० कोटी, एसपीव्हीच्या प्रशासकीय खचार्साठी २ कोटी तर राज्य शासनाचे ४५ कोटी असे एकूण १३७ कोटी एसपीव्हीच्या खात्यात जमा होतील. सध्या शहरात राज्य शासनाकडून स्मार्ट अ‍ॅन्ड सेफ सिटी या ५२० कोटींच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत १२६ कोटींची कामे करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी एसपीव्हीलाही आपला हिस्सा देणे बंधनकारक आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीसाठी मिळालेल्या रकमेतून एसपीव्ही स्मार्ट अ‍ॅन्ड सेफ सिटीकरिता राज्य शासनाला रक्कम देणार आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ‘टाऊन प्लानिंग स्कीम’ सुरू होणार आहे. प्रकल्प व्यवस्थापन केंद्रातर्फे (प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट) ह्यटाऊन प्लानिंग स्किमह्णची अंमलबजावणी होणार आहे. यासाठी तीन प्रस्ताव आले असून यातील एकाची निवड करून ही योजना राबविली जाणार आहे. एरिया बेस डेव्हलपमेंट अंतर्गत पारडी, पूनापूर, भरतवाडा येथे पायाभूत सुविधांसोबत ड्रेनेज लाईन, पथदिवे याशिवाय चार हजार स्वस्त घरांची योजना आहे. यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)