शिकविण्याच्या बहाण्याने १३ वर्षीय मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2022 20:11 IST2022-10-10T20:11:28+5:302022-10-10T20:11:55+5:30
Nagpur News भाडेकरू तरुणाने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीचा शिकविण्याच्या बहाण्याने विनयभंग केला. याप्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

शिकविण्याच्या बहाण्याने १३ वर्षीय मुलीचा विनयभंग
नागपूर : भाडेकरू तरुणाने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीचा शिकविण्याच्या बहाण्याने विनयभंग केला. याप्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सावनेर येथील विकास गंगाधर दखने (२८) हा प्रतापनगर येथे भाड्याने राहतो. तो कॅब चालवतो. त्याच्या कुटुंबात पत्नी आणि आई आहे. घरमालकाची १३ वर्षांची मुलगी विकासच्या घरी शिकायला येते. रविवारी आई कामावर गेल्यानंतर मुलगी विकासच्या घरी अभ्यासासाठी आली असता विकासने तिच्याशी आक्षेपार्ह वर्तन केले. ही गोष्ट कोणाला सांगू नकोस, मी तुला पैसे देईन, असे आमिष देखील विकासने दाखविले. मुलीने आईला फोन करून घडलेला त्रास सांगितला. आईने प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत विकासला अटक केली.