नागपूर जि.प.च्या १३ शाळांना लागणार कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 20:16 IST2021-02-19T20:15:03+5:302021-02-19T20:16:30+5:30

Schools of Nagpur ZP कमी पटसंख्येमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना कुलूप लावण्याची वेळ आली आहे. २०१८ मध्ये जिल्ह्यातील १६ शाळा बंद करण्यात आल्या होत्या. २०२१-२२ या सत्रात १३ शाळांचा समावेश आहे.

13 schools of Nagpur ZP will have to be locked | नागपूर जि.प.च्या १३ शाळांना लागणार कुलूप

नागपूर जि.प.च्या १३ शाळांना लागणार कुलूप

ठळक मुद्देशिक्षकांसह विद्यार्थ्यांचे होणार लगतच्या शाळेत विलीनीकरण : कमी पटसंख्येचा फटका

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

नागपूर : कमी पटसंख्येमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना कुलूप लावण्याची वेळ आली आहे. २०१८ मध्ये जिल्ह्यातील १६ शाळा बंद करण्यात आल्या होत्या. २०२१-२२ या सत्रात १३ शाळांचा समावेश आहे.

राज्यभरात २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा किंवा त्या शाळेला लगतच्या शाळेमध्ये समायोजित करण्यात येत आहे. या नवीन सत्रात नागपूर जिल्हा परिषदेच्या १३ शाळांवर गडांतर बंद करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेने राबविली आहे. या शाळा बंद करून तेथील विद्यार्थी व शिक्षकांचे लगतच्या शाळेमध्ये समायोजन (विलीनीकरण) करण्याबाबतचे शिक्षण विभागाकडून प्रस्तावित करण्यात आले आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १५३५ शाळा आहेत. पूर्वी या शाळांची संख्या १५५१ इतकी होती; परंतु वर्ष २०१८ मध्ये पटसंख्येअभावी १६ शाळा बंद करून त्यांचे परिसरातील लगतच्या शाळेमध्ये समायोजन (विलीनीकरण) करण्यात आले होते. आता पुन्हा कमी पटाच्या व एक किलोमीटरच्या परिसरात दोन शाळा असलेल्यांपैकी एक शाळा बंद करून त्या शाळेचे दुसऱ्या शाळेमध्ये समायोजन करण्याचे शिक्षण विभागाकडून प्रस्तावित करण्यात आले आहे.

 या जि.प. शाळांचे होणार समायोजन

कामठी प्राथ. शाळा भुगाव क्र.२ प्राथ. शाळा भुगाव क्र. १

कामठी प्राथ. शाळा येरखेडा प्राथ. शाळा मरारटोली

नागपूर प्राथ. शाळा वाडी क्र. २ प्राथ. शाळा वाडी क्र. १

काटोल प्राथ. शाळा कचारी सावंगा क्र.१ प्राथ. शाळा कचारी सावंगा (पुनवर्सन)

काटोल प्राथ. शाळा पारडसिंगा प्राथ. शाळा वडविहिरा

नरखेड प्राथ. शाळा बेलोना क्र.१ प्राथ. शाळा बेलोना क्र. २

नरखेड प्राथ. शाळा खैरगाव क्र.२ प्राथ. शाळा खैरगाव क्र. १

सावनेर प्राथ. शाळा वलनी क्र. १ प्राथ. शाळा वलनी क्र.२

सावनेर प्राथ. शाळा सिल्लेवाडा क्र. १ प्राथ. शाळा सिल्लेवाडा क्र. २

भिवापूर प्राथ. शाळा घाटउमरी (पुनवर्सन) प्राथ. शाळा गाळेघाट

मौदा प्राथ. शाळा तारसा क्र. २ प्राथ. शाळा तारसा क्र. १

हिंगणा प्राथ. शाळा टाकळघाट क्र. २ प्राथ. शाळा टाकळघाट क्र. १

पारशिवनी प्राथ. शाळा कोयलाखदान क्र. २ प्राथ. शाळा कोयलाखदान क्र. १

विद्यार्थी पटसंख्या लक्षात घेता, एकाच परिसरात असलेल्या शाळांचे समायोजन करण्यात येणार आहे. कुठलेही शिक्षक अतिरिक्त होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे.

-भारती पाटील, शिक्षण सभापती, जि.प.

Web Title: 13 schools of Nagpur ZP will have to be locked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.