नागपूर विभागातील आरपीएफचे १३ जवान पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 20:41 IST2020-07-22T20:39:49+5:302020-07-22T20:41:50+5:30
रेल्वे सुरक्षा दलातही १३ कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. इतर जवानांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती विभागीय सुरक्षा आयुक्तांनी दिली.

नागपूर विभागातील आरपीएफचे १३ जवान पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलातही १३ कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. इतर जवानांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती विभागीय सुरक्षा आयुक्तांनी दिली. रेल्वे सुरक्षा दलात आतापर्यंत १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यापैकी ८ रुग्ण बरे झाले असून ५ जणांवर उपचार सुरू आहेत. पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांच्या संपर्कातील इतर जवानांचा शोध घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्यांचा दैनंदिन अहवाल रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने गोळा करण्यात येत आहे. यातील बहुतांश रुग्ण रेल्वे सुरक्षा दलाच्या राखीव दलातील आहेत. नागपूर रेल्वेस्थानकावरही जवानांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.