शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
2
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
3
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
4
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
5
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
6
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
7
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
8
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
9
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
10
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
12
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
13
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
14
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
15
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
16
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
17
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...
19
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
20
रंगावरुन प्रणित मोरेला हिणवायचे लोक, 'बिग बॉस'च्या घरात कॉमेडियनचा खुलासा, म्हणाला- "शाळेत आणि कॉलेजमध्ये..."

‘नदीजोड’मधून वर्षाला १२ हजार कोटींचे उत्पन्न, ३,७१,२७७ हेक्टर जमीन ओलिताखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 15:24 IST

River News : ५३ हजार कोटी रुपये किमतीच्या नदीजोड प्रकल्पातून विदर्भाला वर्षाला सरासरी १२ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची तरतूद आहे.

- गोपालकृष्ण मांडवकरनागपूर - ५३ हजार कोटी रुपये किमतीच्या नदीजोड प्रकल्पातून विदर्भाला वर्षाला सरासरी १२ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची तरतूद आहे. केवळ सिंचनच नव्हे तर,  पेयजल, उद्योग, मत्स्योत्पादन, जलऊर्जा निर्मिती, पर्यटन, कृषी उत्पादकता अशा सर्व माध्यमातून रोजगार निर्मिती वाढविण्याचे नियोजन आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलडाणा या सहा जिल्ह्यातील १५ तालुके सिंचनाच्या बाबतीत सधन होतील, यातून विदर्भाची अर्थव्यवस्था सुधारेल असे नियोजन आहे. सर्व जिल्ह्यातील पीकपद्धती वेगळी आहे. आज सिंचनाच्या सुविधांअभावी पुरेसे उत्पादन घेता येत नाही. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्यांमुळे तर अकोला जिल्हा दुष्काळामुळे चर्चेत आहे. या नदीजोड प्रकल्पातून संत्री, कॉटनबेल्टला नवसंजीवनी मिळू शकते. शेतीच्या उत्पादनातून अन्य प्रक्रिया उद्योग भविष्यात उभारले जाऊन त्यातून मोठी रोजगारनिर्मितीही अपेक्षित आहे.या प्रकल्पाचा आराखडा २०१८ पासून तयार आहे. आता मंजुरीची आणि निधीची प्रतीक्षा आहे. वाढत्या महागाईच्या काळात प्रकल्पाची किंमतही वाढणार असल्याने राज्य सरकार आणि जनप्रतिनिधी कधी मनावर घेणार, हे आता महत्त्वाचे आहे.जिल्हे, सिंचन, पिके  नागपूर - ९२,३२६ हेक्टर : सोयाबीन, कापूस  वर्धा - ५६,६४६ हेक्टर : सेलू (२४,३४९ हे.), आर्वी (३०,६५९ हे.), वर्धा (१,६३८ हे.)  अमरावती - ८३,५७१ हेक्टर : संत्री, कापूस  यवतमाळ - १५,८९५ हेक्टर : कापूस  अकोला - ८४,६२५ हेक्टर : कापूस, सोयाबीन  बुलडाणा जिल्हा ३८, २१४ हेक्टर : कापूस, ज्वारी, उन्हाळी कांदा उत्पन्नाचे वार्षिक स्रोत कृषी उत्पादन - २,१३३ कोटी ८१ लाख रु. पाणी कर (सिंचन सेवा शुल्क) - ५,५६९ कोटी रु. पेयजल पाणीपुरवठा - ११२ कोटी औद्योगिक क्षेत्रासाठी पाणीपुरठा-९५ कोटी २८ लाख रु. मासेमारी-३२ कोटी ३० लाख रु. कॅनल प्लन्टेशन - ४८.६६ कोटी   जलऊर्जा निर्मिती- १८८४ मे.वॅ. एकूण प्रस्तावित उत्पन्न - ११,७९९ कोटी ५२७ लाख रु. लिंकमधून पाण्याचा वार्षिक वापरसिंचन - १२८६ दलघमी. पाणीपुरवठा योजना - ३२ दलघमी. औद्योगिकीकरण - ३९७ दलघमी. प्रस्तावित वापर - १,७७२ दलघमी.

टॅग्स :Waterपाणी