शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मधुमेहामुळे अंधत्वाचे प्रमाण १२ टक्के

By admin | Updated: November 14, 2014 00:45 IST

मधुमेहामुळे १२ टक्के लोकांना अंधत्व येते. बुब्बुळावर जंतुसंसर्ग, काचबिंदू, कमी वयात मोतिबिंदू, तिरळेपणा या सर्व आजारास मधुमेह कारणीभूत आहे. मधुमेही रुग्णांनी त्यांना डोळ्याचा त्रास नसला

मधुमेहामुळे होतो काचबिंदू, मोतीबिंदू : अशोक मदान यांची माहितीनागपूर : मधुमेहामुळे १२ टक्के लोकांना अंधत्व येते. बुब्बुळावर जंतुसंसर्ग, काचबिंदू, कमी वयात मोतिबिंदू, तिरळेपणा या सर्व आजारास मधुमेह कारणीभूत आहे. मधुमेही रुग्णांनी त्यांना डोळ्याचा त्रास नसला तरी वर्षातून एकदा डोळ्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे, अशी माहिती मेडिकलच्या नेत्ररोग विभागाचे विभागप्रमुख डॉ. अशोक मदान यांनी दिली. डॉ. मदान म्हणाले, देशात मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या आजाराचा शरीराच्या इतर अवयवांसोबतच डोळ्यांवर मोठा परिणाम होतो. मधुमेहामुळे डोळ्याच्या मागच्या पडद्यावर रक्ताच्या गाठी तयार होतात; यामुळे डोळ्याच्या मागचा पडदा सरकतो व रक्तस्राव होतो. यामुळे नजर जाण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच मधुमेहींनी वरच्यावर डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. मेडिकलमध्ये अशा रुग्णांसाठी दृष्टिपटलाची तपासणी, डोळ्याच्या दाबाची मोजणी केली जाते. विशेष म्हणजे, मधुमेहामुळे ज्यांना किडनीचे आजार उद्भवले आहेत, अशा रुग्णांनी नियमित डोळे तपासणी करावी. रक्तवाहिन्या बंद होऊ शकतातडायबेटिक रेटिनोपॅथीसाठी डोळ्यांची नियमित तपासणी आवश्यक आहे. मधुमेहामुळे रक्तवाहिन्या बंद होऊ शकतात. रेटिना(डोळ्याच्या आतील पडदा)वरील रक्तवाहिन्या खराब झाल्या तर रेटिनावर पांढरे आणि लाल ठिपके डोळे तपासताना डॉक्टरांना आढळून येतात. असे ठिपके आले तरी रुग्णांना कळत नाही. पण त्यासाठी वेळेवर उपचार करणे गरजेचे असते. ते उपचार न केल्यास डोळा आतून खराब होऊन अंधत्व येण्याची शक्यता असते. (प्रतिनिधी) ५० टक्के मधुमेही अनभिज्ञच५० टक्के मधुमेहींना नेत्ररोगाची माहितीच राहत नाही. ज्यावेळी खूप जास्त त्रास होतो, त्यावेळी ते उपचारासाठी डॉक्टरांकडे येतात. परंतु अशावेळी अंधत्व रोखणे कठीण जाते. मेडिकलसह शासकीय इस्पितळांमध्ये अशा रुग्णांच्या तपासणीची विशेष सोय आहे. मधुमेहींमध्ये दृष्टी वाचविण्यावर जनजागृती होणे गरजेचे आहे.-डॉ. अशोक मदानविभागप्रमुख, नेत्ररोग विभाग, मेडिकल