नागपुरात ११ वर्षाच्या मुलीवर जन्मदात्यानेच केला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 10:55 IST2018-03-05T10:55:41+5:302018-03-05T10:55:48+5:30

११ वर्षांच्या मुलीवर तिच्या जन्मदात्यानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना गिट्टीखदानमध्ये उघडकीस आली आहे.

An 11-year-old girl was raped by her father in Nagpur | नागपुरात ११ वर्षाच्या मुलीवर जन्मदात्यानेच केला बलात्कार

नागपुरात ११ वर्षाच्या मुलीवर जन्मदात्यानेच केला बलात्कार

ठळक मुद्देपांढराबोडीतील घटनागिट्टीखदान ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ११ वर्षांच्या मुलीवर तिच्या जन्मदात्यानेच बलात्कार केल्याची संतापजनक घटना गिट्टीखदानमध्ये उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
पीडित मुलगी सहाव्या वर्गात शिकते. आरोपी पांढराबोडीत राहतो. त्याला दारूचे व्यसन आहे. मुलीची आई रोजमजुरीला जाते तर आरोपी मनात आले तर कामाला जातो नाही तर पत्नीच्या कमाईवरच जगतो. नोव्हेंबर २०१७ मध्ये एका दिवशी पीडित मुलगी शाळेतून आली तेव्हा तो घरात एकटाच होता. ती कपडे बदलवित असताना त्याने पहिल्यांदा तिच्यासोबत कुकर्म केले. त्यावेळी त्याने हा गैरप्रकार कुणाला सांगितल्यास जीवे ठार मारेन, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेली मुलगी गप्प बसली. परिणामी आरोपी निर्ढावला आणि तो मनात येईल तेव्हा मुलीवर अत्याचार करू लागला. चार महिन्यात त्याने तिच्यासोबत अनेकदा कुकर्म केले. मुलीने विरोध केला असता तो तिला बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी द्यायचा. सततच्या अत्याचारामुळे मुलीची मानसिक अवस्था बिघडली. आईच्या ते लक्षात आले. शनिवारी त्याने पुन्हा तसाच प्रकार केला. मुलीच्या आईने ते बघितले. त्यानंतर शेजाऱ्यांना ही माहिती दिली. त्यामुळे परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झाले. पीडित महिलेने मुलीला घेऊन शनिवारी रात्री पोलीस ठाणे गाठले. तिची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर मुलीची वैद्यकीय तपासणी करवून घेण्यात आली. रविवारी पहाटे ४ च्या सुमारास या प्रकरणी आरोपीविरुद्ध बलात्कार, मारहाण करणे, धमकी देण्याच्या आरोपाखाली तसेच पोक्सो कायद्याच्या कलमावरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Web Title: An 11-year-old girl was raped by her father in Nagpur

टॅग्स :Crimeगुन्हा