शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

१०० कोटींच्या खरेदीची ‘गुढी’

By admin | Updated: April 7, 2016 03:00 IST

साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त नागपुरात विविध बाजारपेठांमध्ये विभिन्न आॅफर्सची रेलचेल आहे.

बाजार हाऊसफुल्ल : दुचाकी, कार व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांना मागणीनागपूर : साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त नागपुरात विविध बाजारपेठांमध्ये विभिन्न आॅफर्सची रेलचेल आहे. एक ग्रॅम सोन्यापासून ते स्वप्नातील घर, गृहोपयोगी वस्तू, दुचाकी, चारचाकी वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. शुभमुहूर्तावर बाजारपेठांमध्ये एकत्रित १०० कोटींपेक्षा जास्त उलाढाल होईल, अशी माहिती आहे.इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत उत्साहमहागाई असतानाही ग्राहक खरेदीसाठी उत्सुक आहेत. गुढीपाडव्यासाठी विविध बाजारपेठांमध्ये उत्साह आहे. व्यापाऱ्यांनी शोरूमही पारंपरिक पद्धतीने सजविल्या आहेत. घर खरेदीचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांसाठी बुकिंगवर आकर्षक आॅफर्स दिल्या जात आहेत. याशिवाय सोनी, सॅमसंग, एलजी, गोदरेज, आयएफबी, नोकिया, हिताची, एस्सर, डेल, एचपी, लिनोव्ह, आसूस, इलेक्ट्रोलक्स या कंपन्याची उपकरणे खरेदीवर ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे. एलईडी, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्ह ओव्हन, लॅपटॉप, कॅमेरा, हॅण्डीकॅम, स्मार्टफोन इंडक्शन शेगडी, लॅपटॉप आदींवर केवळ गुढीपाडव्यापर्यंतच आॅफर देण्यात येत आहेत. नामांकित कंपन्यांच्या लॅपटॉपवर अधिक आॅफर्स आहेत. दुचाकी व चारचाकी खरेदीमारुती, टाटा, टोयोटा, आॅडी, होंडा, जनरल मोटर्स, ह्युंडई, रेनॉल्ट, फोर्ड, फिएट, अशोक लेलँड, शेवरले या नामांकित कंपन्यांच्या प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांवर आर्थिक बचतीच्या आकर्षक आॅफर्स आहेत. इंटरनेटवर खरेदी वाढलीइंटरनेटमुळे या खरेदीचा ट्रेंडच बदलला आहे. आता घरबसल्याही खरेदी करण्यात येते. त्यामुळे दुकानांमध्ये जाऊन तासन्तास घालविण्यापेक्षा इंटरनेटवर काही वेळेतच खरेदी केली जाते. हा ट्रेंड आता चांगलाच रुजू लागला आहे. बाहेर जाऊन फिरण्याचा वेळ व पेट्रोल वाचते. तसेच घरबसल्या लॅपटॉपवर सर्व प्रकारच्या वस्तू पहावयास मिळतात. त्यामुळे घरी बसून आॅनलाईन शॉपिंगचा फंडा सध्या जोरात आहे. आॅनलाईन खरेदी केल्यानंतर वस्तू घरपोच मिळते. तसेच वस्तू खराब असेल तर महिनाभरात परतही करता येते. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता कमीच असते. गुढीपाडव्याला खरेदी शुभ मानण्यात येत असल्याने बाजारपेठांमध्ये उत्साह असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.