पाच वर्षांत १० हजारांवर डॉक्टरांनी नाकारली बंधपत्रित सेवा; ग्रामीण भागात जाण्यास नाखूष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 19:50 IST2017-12-18T19:49:16+5:302017-12-18T19:50:09+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येक डॉक्टरला एक वर्षाचे बंधपत्र पूर्ण करण्यासाठी मेळघाट, गडचिरोली, गोंदिया येथील ग्रामीण भागात पाठविले जाते. मात्र गेल्या पाच वर्षांत १० हजार ६८३ डॉक्टरांनी बंधपत्रित सेवा पूर्ण केली नाही. त्यांची नोंदणीधोक्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

पाच वर्षांत १० हजारांवर डॉक्टरांनी नाकारली बंधपत्रित सेवा; ग्रामीण भागात जाण्यास नाखूष
आॅनलाईन लोकमत
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येक डॉक्टरला एक वर्षाचे बंधपत्र पूर्ण करण्यासाठी मेळघाट, गडचिरोली, गोंदिया येथील ग्रामीण भागात पाठविले जाते. मात्र गेल्या पाच वर्षांत १० हजार ६८३ डॉक्टरांनी बंधपत्रित सेवा पूर्ण केली नाही. अशा डॉक्टरांना नोटीसा बजाविण्यात आल्या असून त्यांची नोंदणीदेखील धोक्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर ग्रामीण भागात जाण्यास तयार होत नसल्याबद्दल डॉ.नीलम गोºहे, संजय दत्त, शरद रणपिसे इत्यादी सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
बंधपत्रित सेवा न करणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र वै