शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

मित्राचा मित्रानेच केला घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:57 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा/मंदाणा : चिरखान धरणात मिळालेल्या युवकाचा मृतदेह हा अकस्मात मृत्यू नसून त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा/मंदाणा : चिरखान धरणात मिळालेल्या युवकाचा मृतदेह हा अकस्मात मृत्यू नसून त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. महेश पावरा यास त्याच्याच साथीदाराने संपविल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी शहादा पोलिसांनी मध्यप्रदेशातील मेदराना येथून जालिंदर खुमानसिंग पावरा यास अटक केली आहे. संशयितास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.१० फेब्रुवारीला ज्योतीबाई महेश पावरा रा. बालझिरी, ता. पानसेमल, जि. बडवानी (मध्यप्रदेश) हिने पती महेश सिताराम पावरा हे चिरखान येथे आला असता तेथुन ते हरवले असल्याची खबर दिल्याने शहादा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. मिसिंगचा तपास सुरु असतांना १२ फेब्रुवारी रोजी बेपत्ता महेश सिताराम पावरा याचा मृतदेह चिरखान लोंढरे धरणात मिळुन आला होता. होता. त्याच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित करण्यात आली होती. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला गती दिली होती.पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मयत महेश पावरा व त्याचे सोबत असलेला जालींदर गुमानसिंग बारेला यांच्यात दोन दिवसापूर्वी बालझिरी गावात भांडण झाले होते. त्या भांडणाचा बदला घेण्यासाठी जालींदर हा मयत महेश पावरा यास चिरखान येथे घेवुन आला व त्याचा गळा दाबुन त्यास जीवे ठार मारुन तलावाचे पाण्यात फेकुन दिले व पसार झाला होता.पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला १३ रोजी मेंदराणा येथून अटक केली. याबाबत गोविंद हिरालाल पावरा यांनी फिर्याद दिल्याने जालींधर बारेला याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयात उभे केले असता त्यास १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किसन पाटील, सहायक निरिक्षक निलेश वाघ, उपनिरीक्षक राजेश पाटील, जमादार दिपक फुलपगारे, अशोक कोळी, तारसिंग वळवी, शशिकांत ठाकरे, संदिप लांडगे, राकेश मोरे, भरत उगले, योगेश माळी यांनी केली.