Marathi Jokes: संगीतात खूप मोठी शक्ती; बायको गाताच नवऱ्याला आली वेगळीच प्रचिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 08:00 IST2021-09-30T08:00:00+5:302021-09-30T08:00:12+5:30
Marathi Jokes: बायको सांगू लागली संगीताची शक्ती; नवऱ्यानं षटकारच ठोकला

Marathi Jokes: संगीतात खूप मोठी शक्ती; बायको गाताच नवऱ्याला आली वेगळीच प्रचिती
बायकोनं नुकताच गाण्याचा क्लास सुरू केला होता.. ती गाणं शिकू लागली होती..
एकदा बायको क्लासवरून घरी आली.. नवरा नुकताच ऑफिसमधून घरी आला होता...
बायको- अहो, ऐका ना...
नवरा- बोल ना...
बायको- संगीतात खूप शक्ती असते.. मेघमल्हार रागामुळे पाऊस पडतो.. आणखी एका रागामुळे तर चक्क पाणी गरम होतं...
नवरा- मग काय..? होऊच शकतं.. तुझं गाणं ऐकून माझं पित्त खवळू शकतं, तर पाणी गरम व्हायला काय आहे..?