Marathi Jokes: माझी आठवण आल्यावर काय करतेस..? बायकोचं उत्तर ऐकून नवऱ्याला जबर धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 18:00 IST2021-12-06T18:00:00+5:302021-12-06T18:00:04+5:30
Marathi Jokes: बायकोनं वापरला नवऱ्याचा हुकूमी एक्का; अहोंना बसला मोठा धक्का

Marathi Jokes: माझी आठवण आल्यावर काय करतेस..? बायकोचं उत्तर ऐकून नवऱ्याला जबर धक्का
बायको मैत्रिणींसोबत पिकनिकला गेल्यानं नवरा निवांत होता.. घरी हवं तसं वागता येत होतं.. पण बायको अधूनमधून फोन करायची..
बायकोनं असाच एकदा फोन केला..
बायको- तुम्हाला माझी आठवण येते का..?
नवरा- येते ना.. खूप येते..
बायको- मग तेव्हा तुम्ही काय करता..?
नवरा- तुझ्या आवडीचं अमेरिकन ड्रायफ्रुट आईसक्रीम खातो...
बायको- व्वा.. छान...
नवरा- तू काय करतेस माझी आठवण आल्यावर..?
बायको- मी दोन पेग मारते.. कधी कधी संपूर्ण खंबा संपवते...
बायकोचं उत्तर ऐकून नवऱ्याला जबर धक्का बसला...