Marathi Jokes: लग्न झाल्यानंतर आयुष्य कसं असतं? 'अनुभवी' नवऱ्यानं दिलं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 08:00 IST2021-09-25T08:00:00+5:302021-09-25T08:00:12+5:30
Marathi Jokes: लग्नानंतर आयुष्य कसं असतं? जाणून घ्या थोडक्यात...

Marathi Jokes: लग्न झाल्यानंतर आयुष्य कसं असतं? 'अनुभवी' नवऱ्यानं दिलं भन्नाट उत्तर
रमेश, सुरेश आणि गणेश... तीन मित्रांची लग्नावर चर्चा सुरू होती.. रमेशचं लग्न झालेलं, त्याचा संसार तसा बरा चाललेला... तर सुरेश लग्न करून वैतागलेला....
आता गणेशच्या लग्नाचा विषय सुरू होता...
रमेश- अरे, कर रे लग्न... छान अनुभव असतो...
सुरेश- काही नको रे.. कटकट असते नुसती...
गणेश- अरे बाबांनो.. एक काय ते सांगा ना...
रमेश- अरे कसं असतं गण्या.. विवाहित पुरुषाचं आयुष्य काश्मीरसारखं असतं... तसं पाहायला सुंदर दिसतं.. पण दहशत कायम असते...