मराठी जोक : बायकोचा वाढदिवस आणि कंजूष नवऱ्याचं गिफ्ट....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 16:19 IST2023-07-17T16:18:50+5:302023-07-17T16:19:07+5:30
हसा पोट धरुन....

मराठी जोक : बायकोचा वाढदिवस आणि कंजूष नवऱ्याचं गिफ्ट....
बायकोचा वाढदिवस.. कंजूष नवऱ्यानं सकाळी शुभेच्छा दिल्या...
पाकिटाचा विचार करत करत त्यानं बायकोला गिफ्टबद्दल विचारलं..
नवरा- काही गिफ्ट हवंय का तुला माझ्याकडून..
बायकोला नवी कार हवी होती.. तिनं सूचक शब्दांत इच्छा व्यक्त केली..
बायको- मला अशी वस्तू हवीय की मी बसल्यावर लगेच सेकंदात शून्यपासून १०० वर जाईल...
नवरा- बरं.. संध्याकाळी आणेन हा...
संध्याकाळी नवरा बायकोसाठी वजन काटा घेऊन आला...