मराठी जोक : डॉक्टरांनी दिलेलं औषध काही केल्या मिळेना, अखेर....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 16:03 IST2024-01-11T16:03:22+5:302024-01-11T16:03:34+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : डॉक्टरांनी दिलेलं औषध काही केल्या मिळेना, अखेर....
डॉक्टरांनी एका रुग्णाला तपासून प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं...
रुग्ण औषधं खरेदी करण्यासाठी मेडिकलमध्ये गेला..
एक औषध सोडून त्याला इतर सगळी औषधं मिळाली...
बरीच मेडिकल फिरला.. पण प्रिस्क्रिप्शनमधलं शेवटचं औषध मिळेना..
मेडिकल फिरून फिरून रुग्ण थकला... त्यानं दवाखाना गाठला...
रुग्ण- अहो, डॉक्टर हे शेवटी काय लिहिलंय तुम्ही..? कोणतं औषध आहे हे..? मिळतच नाहीए...
डॉक्टर- अहो ते औषधाचं नाव नाहीए.. माझं पेन चालत नव्हतं.. ते चेक करत होतो...