मराठी जोक : मास्तरांनी नाणं ॲसिडमध्ये टाकलं.., गण्याच्या उत्तरानं ठोकला थेट षटकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 16:44 IST2024-04-02T16:44:02+5:302024-04-02T16:44:18+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : मास्तरांनी नाणं ॲसिडमध्ये टाकलं.., गण्याच्या उत्तरानं ठोकला थेट षटकार
विज्ञानाच्या तासाला मास्तर सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन प्रयोगशाळेत गेले..
मास्तरांनी त्यांच्या खिशातून दहा रुपयाचं नाणं काढलं अन् ते अॅसिडमध्ये टाकलं.
मास्तरांनी विद्यार्थ्यांना विचारलं-
आता मला सांगा, हे नाणं अॅसिडमध्ये विरघळून जाईल का..?
गण्या- मास्तर, नाणं अजिबात विरघळणार नाही...
मास्तर- शाब्बास.. पण तुला कसं माहीत..?
गण्या- मास्तर, जर नाणं ऍसिडमध्ये जाऊन विरघळणार असतं, तर तुम्ही ते आमच्याकडून मागितलं असतं. स्वत:च्या खिशातून काढून टाकलं असतं..