मराठी जोक : नवरा बायकोला म्हणाला, तुझ्यासाठी हिऱ्याचा नेकलेस आणतोय....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 16:00 IST2023-07-25T16:00:36+5:302023-07-25T16:00:46+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke Husband said to his wife he is bringing you a diamond necklace husband wife fight joke | मराठी जोक : नवरा बायकोला म्हणाला, तुझ्यासाठी हिऱ्याचा नेकलेस आणतोय....

मराठी जोक : नवरा बायकोला म्हणाला, तुझ्यासाठी हिऱ्याचा नेकलेस आणतोय....

नवरा-बायकोचं सकाळी कडाक्याचं भांडण झालं....

नवऱ्यानं ऑफिसमधून बायकोला मेसेज केला..

'आज रात्री माझे काही मित्र घरी येताहेत.. छान जेवण कर..'

बायकोकडून कोणताही रिप्लाय आला नाही.. 

नवऱ्यानं बायकोला पुन्हा मेसेज केला.. 'माझा पगार वाढलाय.. प्रमोशन मिळालंय.. पुढल्या महिन्यात तुला हिऱ्यांचा नेकलेस घेऊ..'

बायकोनं लगेच रिप्लाय केला.. 'काय सांगता..? खरंच..?'

नवऱ्यानं रिप्लाय केला..

'नाही ग.. तुला पहिला मेसेज मिळाला की नाही ते चेक करत होतो.. नाही तर म्हणशील मला मेसेज मिळालाच नाही.. मी पाहिलाच नाही मोबाईल..'

Web Title: Marathi Joke Husband said to his wife he is bringing you a diamond necklace husband wife fight joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद