शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Marathi Joke: लाॅकडाऊनमध्ये हैराण झालेल्या एका नवऱ्याचा भन्नाट किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 09:41 IST

Marathi Joke: लाॅकडाऊनमध्ये एक त्रस्त पण व्यस्त असलेला नवरा अन् बरंच काही...

किचनची जबाबदारी स्विकारल्यावर पहिल्याच दिवशी मोठ्या हौशीने "इडली सांबारचा' बेत आखला.

पण इडलीच्या मानाने सांबार जास्त प्रमाणात बनवले गेले. ते फुकट जाऊ नये म्हणून रात्री 'मेदूवड्याचा' घाट घातला.

त्यामुळे सांबार तर संपले, पण मेदूवड्याचे पीठ खूपच शिल्लक राहिले होते. मग पुढच्या जेवणाला त्याचे 'दहीवडे' करायचे ठरविले.

पुढच्या जेवणात वडे संपून गेले पण दही शिल्लक राहिले. म्हणून रात्रीसाठी 'दही बटाटा पुरीचा' बेत आखला.

ह्या मेनूतल्या पु-या संपल्या, पण उकडलेले बटाटे खूपच जास्त होते आणि दहीही शिल्लक होते. त्याचा उपयोग व्हावा म्हणून पुढच्या जेवणात 'अलूपरोठा दही' असा बेत नक्की केला.

इथेही आलू परोठे संपले, पण पुन्हा दही शिल्लकच राहिले. ते संपवण्यासाठी 'दहीबुंदीशेव' करायची ठरवली.

त्या कार्यक्रमात एकदाचे ते दही संपले आणि शेव पण संपली, पण शिल्लक असलेल्या बुंदीचे काय करायचे असा प्रश्न पडला.

म्हणून पुढच्या जेवणाला 'टोमॅटो बुंदी कुरमुरा' करा अशी फर्माईश आली.

घरातल्या मंडळींना हे एकेक पदार्थ कुठून ऐकायला मिळतात काही कळत नाही.

ते केल्यानंतर टोमॅटो शिल्लक राहिले!

टोमेटो शिल्लक राहिल्यामुळे त्याचे सूप बनवून पुढच्या जेवणाला  'पुलाव सूप' हा प्रकार बनवण्याची ऑर्डर आली.

सूप सर्वांनी घटाघटा संपवलं, पण पुलाव काही संपवू शकले नाहीत.  म्हणून रात्री पुलावामध्ये घालण्यासाठी ग्रेव्ही बनवली आणि पुलावाची 'बिर्याणी' केली.

इथे ग्रेव्ही जरा जास्तच बनली. मग त्यापासून 'मिक्स वेजिटेबल' आणि सोबतीला पोळ्या असा बेत ठरवला.

पण त्यातल्या पोळ्या भरपूर शिल्लक राहिल्यामुळे दुस-या दिवशी त्या संपवण्यासाठी 'दाल फ्राय'चा बेत ठरवावा लागला.

आता इथे डाळीचे प्रमाण जास्तच झाले.

शिजलेली डाळ उरली तर त्याचे सांबार छान करता येते, असे ऐकवण्यात आल्यामुळे रात्रीच्या जेवणाला त्या सांबाराबरोबर इडल्या बनवून 'इडली सांबार' करण्याची कल्पना पुढे आली.☝🏼☝🏼☝🏼☝🏼पण ते न करता मी ते सांबार नुसतं पिऊन टाकलं. कारण ज्या मार्गावरून मी आलो होतो तो मार्ग 'इडली सांबार' पासूनच सुरू झाला होता.तो मार्ग  रिपीट करायची माझी तयारी नव्हती.

-एक त्रस्त पण व्यस्त असलेला नवरा -

मन लावून वाचल्याबद्दल धन्यवाद😛🤪😝

टॅग्स :Jokesविनोदcorona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न