मराठी जोक : हॅलो मी बोलतेय... नवऱ्याचा फोन वाजला आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 16:29 IST2024-03-04T16:29:47+5:302024-03-04T16:29:56+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : हॅलो मी बोलतेय... नवऱ्याचा फोन वाजला आणि...
नवरा-बायकोमध्ये सकाळी प्रचंड भांडण झालं..
नवरा ऑफिसला गेला.. रात्री उशिरापर्यंत तो परत आला नाही...
बायको सतत फोन करत होती.. पण नवरा फोन उचलेना.. नवरा मित्राच्या घरी बसला होता...
वैतागलेला नवरा घरी जाण्याच्या मनस्थितीत नव्हता.. त्यामुळे तो बायकोचे फोनच घेत नव्हता...
मध्यरात्री बायकोचे फोन थांबले... ३ वाजता शेजारणीचा कॉल आला... नवऱ्यानं लगेच उचलला...
शेजारीण- हॅलो, ऐका ना, मी बोलतेय...
नवरा- हा बोल ना...
तितक्यात समोरून बायकोचा आवाज आला...
बायको- माझे शंभर कॉल उचलले नाहीत... तेव्हा धाड भरली का होती तुम्हाला..? आता हिच्या नंबरवरचा कॉल एका फटक्यात उचलला... या घरी.. बघतेच तुम्हाला.. नाही तंगडं तोडलं ना...