Marathi Jokes: फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मिळाला 'असा' चहा; आणखी काही मागवण्याची इच्छाच होईना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 11:15 IST2021-03-11T11:15:38+5:302021-03-11T11:15:48+5:30
Marathi Jokes: पहिल्यांदाच फाईव्ह स्टार हॉटेलात गेलेल्या गण्याची गंमत

Marathi Jokes: फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मिळाला 'असा' चहा; आणखी काही मागवण्याची इच्छाच होईना
गण्या पहिल्यांदाच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेला आणि वेटरला चहाची ऑर्डर दिली...
वेटरनं एक ट्रे आणला.. त्यात गरम पाणी, टी बॅग, शुगर क्यूब आणि दूध पावडर होती..
गण्यानं कसाबसा चहा तयार केला आणि प्यायला..
थोड्या वेळानं वेटरनं विचारलं, तुम्ही अजून काही घेणार का सर..?
गण्या म्हणाला- तशी तर मला भजी खावीशी वाटतेय.. पण तू तेल, बेसन, मीठ, मिरची पावडर, कढई आणि शेगडी समोर आणून ठेवशील याची भीती वाटते...