शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

यमातो नादेशिको

By admin | Updated: January 2, 2016 13:41 IST

आपण भारतीयांनी सहीसही अनुकरण करावं, अशा कितीतरी गोष्टी जपानमध्ये पाहिल्या. रिसायकल दुकानं ही त्यातली एक! वापरलेले पण जुने न झालेले कपडे, पर्सेस, चपला-बूट इ. गोष्टी इथे कमी किमतीत मिळतात. ही दुकानं जपानमध्ये खूप लोकप्रिय आहेत. मुळातच जपानी माणूस वस्तू अगदी निगुतीने वापरतो.

‘चांगली बायको आणि हुशार आई’ हे जपानी स्त्रीला अभिमानास्पद असं विशेषण. याबाबतीत त्या भारतीय स्त्रीच्या सख्ख्या बहिणीच जणू!
 
आपण भारतीयांनी सहीसही अनुकरण करावं, अशा कितीतरी गोष्टी जपानमध्ये पाहिल्या. रिसायकल दुकानं ही त्यातली एक! वापरलेले पण जुने न झालेले कपडे, पर्सेस, चपला-बूट इ. गोष्टी इथे कमी किमतीत मिळतात. ही दुकानं जपानमध्ये खूप लोकप्रिय आहेत. मुळातच जपानी माणूस वस्तू अगदी निगुतीने वापरतो. घरं लहान आणि ¬तूनुसार कपडे घालण्याची सवय असल्यामुळे एकदा कपडे घेतले की दुस:या ऋतूत ते अशा रिसायकल शॉप्समध्ये विकले जातात. अनेक मध्यमवर्गीय आणि सधन लोकही या दुकानात अत्यंत स्वस्तात खरेदी करतात. त्यात कमीपणा मानला जात नाही. 
- या दुकानांमध्ये भारतीय चेहरेही दिसत; पण खरेदीच्या आनंदापेक्षा कोणी पाहत नसेल ना याची भीती आणि संकोचच जास्त!
 
माझ्या नव:याची नोकरी फिरतीची. त्याच्यामागून मी जगभरात कुठेकुठे फिरले. वेगवेगळ्या देशात घरं केली. जाऊ तिथे नव्या उत्साहाने संसार मांडला आणि एकच केलं. चीनमध्ये जाऊन वरणभात-भरीत भाकरीचा आग्रह धरणं, नाहीतर ब्राझीलच्या समुद्रकिना:यावर सलवार कमीज घालून ओढणी सावरत फिरणं कटाक्षाने टाळलं. देश तसा वेश केला. नवनव्या महानगरांमध्ये लिटल इंडिया शोधण्याच्या उपद्व्यापांऐवजी आवजरून स्थानिक मैत्रिणी मिळवल्या. त्यांच्या घरी गेले, त्यांची भाषा यावी म्हणून धडपडले. जिवाभावाची किती नाती कमावली मी या प्रवासात आणि जगण्याची समजही!
जपानपासून सुरुवात करते. टोकियोत राहायला गेल्यावर पहिल्यांदा झटका दिला तो तिथल्या स्त्रियांनी. सुरु वातीच्या काळात मला जपानी स्त्री नुक्त्याच ओव्हनमधून बाहेर काढलेल्या कुकीजसारखी वाटायची. अत्यंत स्लीम, चेह:यावर मेकअप, केसाच्या विविध रचना, देखणो नाजूकसे कपडे, पर्स, चपला, टोपी, छत्री, हातातला पंखा, फवारलेलं अत्तर, सजवलेला सेलफोन. चित्रच जणू!
जपानमध्ये श्रीमंत-गरीब असा टोकाचा भेदभाव नाही. सगळेच मध्यमवर्गीय. अतिश्रीमंत फार थोडे. गरीब तर दुर्मीळ. सरकारच्या अनेक सुविधांमुळे राहणीमान उंचावलेलं. उत्तम शिक्षण, वैद्यकीय सेवासुविधा, वृद्धांसाठी योजना, नोकरदार आईसाठी ठरावीक किलोमीटरच्या परिसरात मोफत आणि उत्तम पाळणाघरं. गरोदर बाईला एक गुलाबी रंगाचा टॅग दिला जातो जेणोकरून तिला प्रवासात सहप्रवासी मदत करतील. मूल जन्माला येणार असेल तर तिथे आईला सरकारकडून मोठी आर्थिक मदत केली जाते. 
मी रुळत गेले तसं लक्षात यायला लागलं, जपानी स्त्री दिसते तशी नाही. मुलाला शाळेत सोडण्यासाठी बसस्टॉपवर जाऊ लागल्यावर नव्या मैत्रिणी मिळाल्या. त्या ‘माम्मातोमो’. म्हणजे तुमच्या मुलाशी ज्यांची दोस्ती आहे, अशा मुलांच्या आया. 
त्यांच्याबरोबर गप्पा होऊ लागल्या आणि मग हलकेहलके मी जपानी घरांमध्ये डोकावू लागले.
सकाळी सहाला घर सोडणारे जपानी बाबा रात्री उशिरा घरी येतात. दरम्यान, मुलांना वाढविण्यापासून ते सासू-सास:यांना सांभाळण्यार्पयत सगळी कामं जपानी आईच करते. नव:याला पायमोजे घालून देण्यापासून ते मुलांच्या बाबतीतील सर्व निर्णयही आई घेते. सगळे रीतिरिवाज साग्रसंगीतपणो पाळून, कोणतीही तक्र ार न करता ही आई वसंत बापटांच्या ‘बाभूळ झाडा’ प्रमाणो उन्हातान्हात कुटुंबासाठी उभी असते. हे सगळं करताना ती तरुण राहण्यासाठी, दिसण्यासाठी अथक प्रयत्न करते. परवडत असेल तर खासगी नाहीतर जागोजागी असलेल्या सरकारी जिममध्ये जाऊन ती व्यायाम करते. मोजकंच खाते. घर स्वच्छच नाही तर अतिशय सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करते. कपडे कसे वाळत घालायचे, कपडय़ांची सुंदर आणि लहान घडी कशी घालायची असल्या विषयांवर टीव्हीवर कार्यक्रम असतात. कपडय़ांची रंगसंगती, उन्हाचा अंदाज, ¬तुमान, कपडय़ांचा पोत आणि घरातील कोणत्या व्यक्तीचे ते कपडे आहेत यावर ते कसे वाळत घालावे, याचं शास्त्र असतं. पूर्वीच्या काळी नव:याचे कपडे सर्वात आधी, मग मुलांचे आणि सर्वात शेवटी बायकांचे असा क्रम होता. काळानुसार हे सगळं आता बदललं आहे म्हणतात.
मुलांना जेवणाचा, खाऊचा डबा देणं हे तर जपानी आईचं सर्वोच्च कलाकौशल्य मानलं जातं. पौष्टिक आणि आकर्षक जेवण रांधण्यात जपानी आईचा हात कुणी धरू शकत नाही.
तोमोमी सान या माङया मैत्रिणीला भेटल्यावर मला कळलं, की आपल्या मुलांनी वेळेवर जेवावं, निरोगी राहावं यासाठी ही बाई किती जिवापाड प्रयत्न करतेय. तिचा मुलगा केजीत असताना डबा न खाता तसाच घरी परत आणत असे. मग तोमोमी सानने मुलाच्या आवडीच्या कार्टूनच्या व्यक्तिरेखा वापरून पदार्थ बनवण्याची शक्कल शोधली. हळूहळू त्या हौशीचं शास्त्रच तयार झालं. तिच्या तीन मुलांना वाढविताना तिने आकर्षक ‘ओबेन्तो’ म्हणजेच जेवणाचा डबा तयार करण्याची कला जोपासली. तिची ही आवड पुढे इतकी विस्तारली आणि प्रसिद्ध झाली की तिने आतापर्यंत हजाराहून जास्त आकर्षक डिझाईनचे स्नॅक्स मुलांसाठी बनविले आहेत. जपानमधीलच चॅनेल्सच नव्हे,  तर बीबीसीनेदेखील तिच्या या प्रयोगशील आईपणाची दखल घेतली, आणि आता तोमोमी जगभरातील आयांची आयकॉन झाली आहे.
 सायकलवर एक मूल मागे आणि एक पुढे ठेवून, भाजी खरेदी करून परतणा:या या आया मला जपानमध्ये दिसायच्या तेव्हा वाटायचं की या जपानी स्त्रिया मेकअप करून नुसत्या सायकलवर फिरतात की काय? छान छान दिसायचं, गोड गोड हसायचं आणि नाजूक नाजूक वागायचं!. पण त्यापलीकडली जपानी स्त्री फार खमकी आणि कणखर असते, हे नंतर हळूहळू कळत गेलं.
‘यमातो नादेशिको’ म्हणजे ‘चांगली बायको आणि हुशार आई’ हे जपानी स्त्रीला अभिमानास्पद असं विशेषण. सत्तर वर्षांची आयको सान ही आमच्या घरी मदतनीस म्हणून येत असे. जपानमध्ये घरकाम करणा:या स्त्रियांना तासावर पैसे मिळतात आणि ते नोकरदार माणसांइतके जास्त असतात. आमच्याकडे ही आयको सान आठवडय़ातून दोनदा येत असे. आजीबाई नियमित बोटोक्स करून तरुण दिसायच्या. स्वत:च्या मोठय़ा गाडीतून मुलांची शाळेत ने-आण करणारी ही बाई पहाटे चार वाजेपासून काम करायची. दहा घरची कामं, जेवणाचे डबे पोहोचवणं, संध्याकाळी काही लहान मुलांचं बेबी सिटींग, वृद्धाश्रमात जाऊन अनाथ वृद्धांची काळजी, काहींच्या घरी जाऊन त्यांना अंघोळ घालणं. अशी कितीतरी कामं या आजीबाई पटापट करते. ही आयको सान जपानमधली आमची आईच झाली होती जणू! तिची एकुलती एक मुलगी मूल पोटात असताना घटस्फोट घेऊन परत आली. मग लेकीचं बाळंतपण केलं. ती नात पाच वर्षाची असताना लेक गेली. नातीची जबाबदारी घेताना ही बाई पुन्हा तरु ण होऊन गेली. दुपटीने व्यायाम करून, मेहनत करून ती एकटीने नातीला वाढवत होती. पियानो, स्वीमिंग, बॅलेपासून इंग्लिश स्पिकिंगच्या कोर्सपर्यंत सर्व क्लासेसमध्ये नातीला घातलं होतं तिने. आपल्या नातीला सगळं यावं, हा उद्देश. नातीच्या नावावर सरकारतर्फेदरमहिना ठरावीक रक्कम येत असे. पण तिने त्याला कधीही हात लावला नाही. अपार कष्ट करून ही बाई आयुष्य जगत होती. मला तिचं फार कौतुक वाटे.  या अशा स्त्रियांनी जपानी समाज बनला आहे.
त्यांच्या चेह:यावरील एकेक सेंटीमीटरची मेकअपची पुटं काढली की जाणवतं, बाहुली सारखी दिसणारी ही जपानी स्त्री फक्त हसरा चेहरा लोकांसमोर दाखवते. तिचे कष्ट, मेहनत याबद्दल चकार शब्दही काढत नाही. एक चांगली आई, चांगली बायको होण्यासाठी प्रयत्न करते. नटून थटून लहानसहान सुखाचे प्रसंग साजरे करते. मग तो साकुराच्या फुलांचा बहार असो किंवा एखादी मात्सुरी! किती जपानी स्त्रिया माङया मैत्रिणी होत्या. अजूनही ही मैत्री टिकून आहे. त्यांना भेटलं, की मला वाटे ही तर भारतीय स्त्रीचीच सहोदर!
एकीला झाकावी, तर दुसरी तिच्यासारखीच दिसते!
 
(ब्राझीलमधील रिओ-दि-जानेरिओ येथे वास्तव्याला असलेल्या लेखिका मुक्त पत्रकार आहेत)
sulakshana.varhadkar@gmail.com