शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

 चार बटाटे नेले तर 'सरकार' चिडणार नाही ना?

By अतुल कुलकर्णी | Updated: January 25, 2026 13:25 IST

हल्ली मिक्स भाजीचे दिवस आहेत. मराठवाड्यात भज्जी करतात... कोल्हापुरात मिक्स भाज्यांचे कालवण असते... विदर्भात भाजीची उसळ बनवतात... गुजराती लोक उंदियो करतात... तुम्ही पण सगळ्या भाज्या थोड्या थोड्या घ्या... शिवाजी पार्कच्या मळ्यात या ही वेळी फार कमी भाजी आली आहे... वांद्रेच्या मळ्यात सगळ्या नव्या भाज्या आल्यात... बारामतीचे वाण वेगवेगळे झाल्यापासून त्यांची भाजी चांगली येत नाही

- अतुल कुलकर्णी(संपादक, मुंबई)

प्रिय अशोक नायगावकर, नमस्कार तुम्ही भाजीपाल्यावर कविता लिहिली म्हणून सकाळी भाजी मंडईत जो थरार आम्ही अनुभवला तो तुम्हाला सांगितला पाहिजे. जुन्या कांद्याला पडका भाव आणि नव्या कांद्याला भलताच भाव बघून चक्रावून गेलो. खरंतर जुना कांदा वजनाने हलका, बहुगुणी... पण त्याला कोणी विचारेना... अन् नव्या कांद्याला कोणी सोडेना..! सगळ्या मंडईत हीच अवस्था होती. तिथे एक कल्याणचा भाजीवाला होता. त्याने दादरच्या गिऱ्हाईकासाठी पाच-सहा नवे कांदे आणले होते. पण ते ठाण्याच्या माणसाने मधल्या मध्येच नेले ना... त्यावर शिवाजी पार्कातले ग्राहक नाराज झाले. असल्या भाजीवाल्यांची शिसारी आली असेही म्हणाले. नायगावकर, तुम्हाला सांगतो, भाजी एकाची, भाव ठरवणारा दुसरा, नेणारा तिसरा, खाणारा चौथा... ज्याने पिकवलं तो बसला हात चोळत... खतरनाक सीन होता मंडईत. काही अनोळखी भाज्या कुठून आल्या होत्या कोणास ठाऊक..? पण ठाण्यातली, विदर्भातली माणसं आली, की त्या भाज्या पटापटा थेट त्यांच्या पिशवीत जाऊन बसायच्या...

भाजीवाला म्हणत होता, हल्ली मिक्स भाजीचे दिवस आहेत. मराठवाड्यात भज्जी करतात... कोल्हापुरात मिक्स भाज्यांचे कालवण असते... विदर्भात भाजीची उसळ बनवतात... गुजराती लोक उंदियो करतात... तुम्ही पण सगळ्या भाज्या थोड्या थोड्या घ्या... शिवाजी पार्कच्या मळ्यात या ही वेळी फार कमी भाजी आली आहे... वांद्रेच्या मळ्यात सगळ्या नव्या भाज्या आल्यात... बारामतीचे वाण वेगवेगळे झाल्यापासून त्यांची भाजी चांगली येत नाही. फार थोडी भाजी आली आहे त्यांची. पाहिजे तर घेऊन जा. ती भाजी बटाट्यासारखी कशातही पटकन मिसळते. तिची पहिल्यासारखी चव नाही उरली... पालेभाज्या नेताना जपून न्या. काँग्रेस गवत कोणत्याही भाजीत असू शकते. कितीही उपटायचा प्रयत्न केला तरीही काँग्रेस गवत काही जात नाही... त्यामुळे ते निवडून निवडून बाजूला काढावे लागते... विदर्भातली वांगी हल्ली फारच फेमस आहेत. कुठे पण उगवतात..! पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा सगळीकडे विदर्भातल्या वांग्यांचा पीक जोरात आहे... मुंबईत सुद्धा विदर्भातली वांगी चांगली आली आहेत... या वांग्याची भाजी खाल्ली की छान झोप लागते... कशाचीही चिंता उरत नाही...

ठाण्यातल्या मळेवाल्याने त्याचं बियाणं सगळीकडे दिलं होतं... ठाण्यात पीक चांगलं आलं... इतर ठिकाणी फारसं आलं नाही. पण ठाण्यातला माळी दिलदार आहे. फुकट पण भाजी द्यायला तयार असतो... वेळप्रसंगी तुमची भाजी चढ्या दामाने विकत घ्यायची त्याची तयारी असते... सगळ्या भाज्या घेऊन घरी जा... मस्त मिक्स भाजी करा... वहिनीसाहेब खुश होतील... अरे पण चार दोन बटाटे इकडेचे तिकडे नेले तर तुझे सरकार रागावणार तरी नाही ना... त्यावर तो शंकायुक्त नजरेने पाहात होता...

नायगावकर, तुमची शाकाहारी कविता आता कामाची राहिली नाही. दुधी भोपळ्याची त्वचा क्रूरपणे सोलली गेली तरी... संत्र्या, मोसंब्या, केळ्यांची साल उतरवली गेली बाजारात तरी... फडकण्याने गळा आवळून मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवलंय चक्क बनवण्यासाठी तरी... धारेवर किसली जातायत गाजरं, पिळवणूक चाललीय आंब्याची तरीही... नायगावकर, आता काळ बदलला आहे. या अशा भाज्यांच्या कथित अन्यायाकडे सगळी भाजी मंडई आणि भाजी घेणारे पूर्ण दुर्लक्ष करायला शिकले आहेत... भाज्या पिकवणारे सुद्धा त्यांना हव्या तशाच भाज्या पिकवतात... वांगी, शहाळी विशिष्ट आकाराचीच पिकवतात... कोणत्या भाजीत किती गोडी असावी? कोणती भाजी किती तिखट ठेवावी? कोणती फळं किती आंबटगोड असावी? हेदेखील हल्ली तेच ठरवतात... निसर्गावर विसंबून राहणं हल्लीच्या भाजीवाल्यांनी सोडून दिलं आहे... सगळ्या भाज्यांनी दुसऱ्या भाजीवर होणाऱ्या अन्यायाकडे न्याय भावनेतून बघणे सुरू केले आहे... आम्ही देऊ तीच भाजी घ्या आम्ही सांगू तोच मसाला वापरा आणि जेवण छान झाले म्हणून टीव्ही बघत बसा, असेही भाजीवाले सांगतात हल्ली... तेव्हा, नायगावकर आता या नव्या भाजी पद्धतीवर कविता करायला लागा...

- तुमचाच, बाबुराव

English
हिंदी सारांश
Web Title : Will 'the government' get angry if four potatoes are taken?

Web Summary : A humorous take on market dynamics, vegetable prices, and changing agricultural practices. Farmers adapt, prioritizing profit over natural produce. Consumers accept the altered reality.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Maharashtraमहाराष्ट्र