शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

जीवच का संपवला रे भावा?

By किरण अग्रवाल | Updated: November 21, 2021 11:10 IST

Farmer Suicede : निसर्गाची अवकृपा व वाढत्या नापिकीसारख्या कारणांनी अल्पभूधारक शेतकरी कसा त्रासला आहे व पराकोटीचा खचत चालला आहे.

-  किरण अग्रवाल

संकट अगर समस्यांनी नाउमेद व्हायला होते हे खरे, पण म्हणून त्यापुढे गुडघे टेकायचे नसतात. उलट संकटावर मात करीत यशाचे तोरण बांधून दाखवायचे असते. त्यातच असतो खरा पुरुषार्थ, मात्र प्रत्येकालाच हे जमते असेही नाही. परिस्थितीशरणता म्हणा किंवा हतबलता; त्यातून आशेचा पुसटसा प्रकाश दिसत नाही व भविष्याची वाट अंधारलेली दिसू लागते आणि मग अशा स्थितीत खचलेले मन या सर्व जंजाळातून बाहेर पडायच्या विचाराप्रत येऊन ठेपते. घात होतो तो याच टप्प्यावर. प्रवीणचेही दुर्दैवाने तेच झाले म्हणायचे.

 

मूर्तिजापूर तालुक्यातील साखरी गावच्या प्रवीण पोळकट या तिशीतल्या तरुणाने गळफास घेऊन आयुष्य संपविले. आत्महत्येपूर्वी प्रवीणने केलेली एक व्हिडीओ क्लिप समाज माध्यमांत प्रसारित झाली असून, त्यात त्याने आपली जी वेदना व्यक्त केली आहे ती संवेदनशील मनाची हळहळ घडवून आणणारीच आहे. कॅन्सरग्रस्त पित्याच्या नावावर असलेल्या तीन एकर शेतीला गहाण ठेवून जे ट्रॅक्टर प्रवीणने घेतले होते ते कर्जाचे हप्ते थकल्याने संबंधित कर्जदार कंपनीने ओढून नेले, त्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे प्रवीणने म्हटले आहे. वारंवार होणारी निसर्गाची अवकृपा व वाढत्या नापिकीसारख्या कारणांनी अल्पभूधारक शेतकरी कसा त्रासला आहे व पराकोटीचा खचत चालला आहे, तेच या दुर्दैवी घटनेतून लक्षात यावे.

 

खरेतर गेल्या सुमारे दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीने अवघे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रत्येकालाच काही ना काही प्रमाणात कोरोनाचा फटका बसून गेला आहे. या दुःखातून व धक्क्यातून काहीसे सावरत नाही तोच यंदाही अतिवृष्टीने बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आणून ठेवले. पूर पाण्याने नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या, पिके वाहून गेली. नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी शासन आपल्या परीने प्रयत्न करीत आहेच, पण ते कितपत पुरे पडणार? बळीराजाप्रमाणेच नोकरी गमावलेल्यांच्या आपल्या व्यथा आहेत. लॉकडाऊनमुळे रोजीरोटी बुडालेले तांडेच्या तांडे अनवाणी पायाने गावाकडे निघालेले आपण बघितले आहेत. अनेकांचा व्यापार बंद झाला, बुडाला. थोडक्यात, अपवाद वगळता सर्वच घटकांना फटका बसला; पण तो सोसून सारे उभे होत आहे.

 

महत्त्वाचे म्हणजे, कोरोनानंतरच्या नवीन चलनवलनाचा, जीवनशैलीचा आता आरंभ झाला आहे. संकटातून बाहेर पडून व जगण्याची एक नवी उमेद घेऊन सारे काही सुरळीत होऊ पाहत आहे. अशात कोरोना व त्यातून कोसळलेले दुःख दूर सारून उभे होत असताना पुन्हा परिस्थितीवश आत्महत्या घडून येणार असेल, तर धास्तावलेल्या समाजमनाला उभारी मिळवून द्यावयास समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण कमी पडलो की काय; असा प्रश्न उपस्थित व्हावा. कोरोनापूर्वी अशाच परिस्थितीने जेरीस आणलेल्या विदर्भ व वऱ्हाडातील शेतकऱ्यांच्या लागोपाठच्या आत्महत्यांनी अवघे राज्य हादरले व कळवळलेही होते. आता कोरोनानंतर पुन्हा कर्जबाजारीपणा, नापिकी व नाउमेदीचे चक्र समोर येणार असेल आणि त्याकडे यंत्रणांकडून असंवेदनशीलपणे बघितले जात असेल तर ते गंभीर ठरावे. प्रवीणच्या आत्महत्येने याकडेच सर्वांचे लक्ष वेधले आहे म्हणायचे.

 

अर्थात, अडचणी कितीही असल्या आणि निराशा दाटून असली तरी प्रवीण तू असे टोकाचे पाऊल उचलायला नको होते रे. कर्ज देणाऱ्या संस्थेने ट्रॅक्टर ओढून नेले म्हणून काय झाले, ते सोडवून ट्रॅक्टरच काय; विमान खरेदी करण्याची जिद्द घेऊन या संकटाच्या छाताडावर उभे राहता आले असते. जितेपणी पित्याच्या वाट्याला मरण वाढून स्वतःला संपवणे चुकीचेच होते प्रवीण. अरे, कुटुंबाचा विचार केला असता व जवळच्या मित्रांशी बोलून मन मोकळे केले असते तर मार्ग निघाला असता. आपल्या अकोल्याचेच कवी किशोर बळी यांच्या एका कवितेत म्हटले आहे,

''तुझं जीणं भारी खडतर, हे सगळं सगळं खरं

पण तुझ्या या प्रश्नावर, आत्महत्या नसे उत्तर!!

घाबरण्याने तुझ्या अशा गड्या, पर्वत झाली राई

हे जीवन एक लढाई, कधी हिंमत हारायची नाही !!''

मग तू का हिम्मत हारलास रे गड्या? जराशा लढाईस सोडून तू आपला जीवच का संपवला रे भावा?

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या