शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक लांबल्याचा लाभ कुणाला?

By किरण अग्रवाल | Updated: March 13, 2022 11:50 IST

Who benefits from the protracted election : अकोल्यात काय होणार, हे या गावातील लोकांनाच ठरवायचे आहे. गतकाळात अकोल्याचा कोणता विकास झाला, तो कोणी केला, कसा केला हे सारे लोकांसमोर आहे.

ठळक मुद्देअकोला महापालिकेसाठी भाजप तयारीतअन्य पक्षीय चाचपणीतच!

-   किरण अग्रवाल

अकोला महापालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काहीशा लांबणीवर पडणे हे तयारी नसलेल्या पक्षांच्या पथ्यावर पडले आहे खरे, पण आपसातील धुसफूस थांबवून ते या वाढीव वेळेचा लाभ उचलतील का हा प्रश्नच आहे. अन्य राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालांचा अकोल्यात काय परिणाम होणार, या चर्चेतच वेळ दवडला जाणार असेल तर संबंधितांना ‘अच्छे दिन’ची अपेक्षा करता येऊ नये.

 

अकोला महापालिकेतील नगरसेवकांचा कालावधी संपुष्टात आला असून, प्रशासकीय कारकीर्द सुरू झाली आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली न निघाल्यामुळे नागरी स्वायत्त संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्याने इच्छुकांना तयारीला अधिक वेळ मिळाला आहे. अर्थात सत्ताधारी भाजपने त्यांची तयारी यापूर्वीच सुरू केली असून, इतर पक्षांना या लांबलेल्या निवडणुकीतून जो आणखी वेळ मिळून गेला आहे, तो सत्कारणी लावता येतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. विशेषतः पाच राज्यांच्या अलीकडेच ज्या निवडणुका झाल्या, त्या निकालाचा परिणाम येथे होणे गृहीत धरले जात असल्याने भाजपेतरांनी कंबर कसणे अपेक्षित आहे.

 

खरे तर राज्यांच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळी गणिते असतात, त्याचेच प्रत्यंतर पाचही राज्यांच्या निकालामध्ये दिसून येत आहे. यातील लगतच्या गोव्यामध्ये भाजपला देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व लाभले व इतरही तीन ठिकाणचे निकाल पाहता महाराष्ट्रातील भाजपचा उत्साह दुणावून जाणे स्वाभाविक आहे. अकोल्यातही फटाके फोडले गेले व पेढे वाटले गेले, हा आनंद स्वाभाविक आहे; पण याचा अर्थ अकोला महापालिकाही पुन्हा आपल्यालाच राखता येईल असा समज भाजपला करून घेता येऊ नये. राज्याच्या निवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यात मोठा फरक असतो. पंजाबमध्ये ‘आप’ने स्तिमित करणारे यश मिळवले. तेथील यशाबद्दल अकोल्यातील आपच्या कार्यकर्त्यांनीही जल्लोष केला. या पक्षाची वाटचाल यशोदायी झाली आहे, ती पक्ष कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणारीही आहे; पण त्याला संघटनात्मक कार्याची, जनमानसावरील प्रभावाचीही जोड लाभणे गरजेचे असते. राज्याच्या निवडणुकीत प्रचारासाठी केजरीवाल लाभले, महापालिकेसाठी कोण लाभणार? कुणाचा चेहरा पुढे करून लढणार, असे अनेक प्रश्न आहेत.

 

थोडक्यात, नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर आता अकोल्याचे काय, असा प्रश्न तितकासा संयुक्तिक ठरू नये. अकोल्यात काय होणार, हे या गावातील लोकांनाच ठरवायचे आहे. गतकाळात अकोल्याचा कोणता विकास झाला, तो कोणी केला, कसा केला हे सारे लोकांसमोर आहे. पक्ष कोणताही असो, सत्ताधारी असोत की विरोधक; नगरसेवकांनी नेमकी कोणती सेवा बजावली याचा विचार केला जाणे अपेक्षित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करताना पक्षाच्या पाठबळासोबतच उमेदवाराची क्षमता अधिक महत्त्वाची ठरते, त्या निकषावरही मतदार विचार करीत असतो. पारंपरिक नेतृत्वाचे लोढणे आता फार काळ वागवण्याची मतदारांची मानसिकता दिसत नाही. लोकांना तत्काळ प्रतिसाद देणारे प्रतिनिधी हवे असतात. तात्कालिक प्रलोभनांना भुलणारा वर्गही आता कमी होत चालला आहे, त्यामुळे कोणताही पक्ष असो की नेता, मतदारांना गृहीत धरून चालता येत नाही. आगामी निवडणुकीची तयारी करताना या सर्व बाबी डोळ्यासमोर ठेवाव्या लागतील.

 

भाजप यासंदर्भातील तयारीत आघाडीवर दिसत आहे, पण इतर पक्षांचे काय? प्रमुख विरोधक शिवसेनेत आपसातच धूमश्चक्री सुरू आहे. नेतेच एकमेकांच्या मागे लागल्याने कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. पक्षाचा अजेंडा राबविण्याऐवजी नेत्यांची पालखी वाहण्यातच अनेकजण धन्यता मानताना दिसत आहेत. काँग्रेसची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. महापालिकेतील गटनेत्याचा जो प्रकार अलीकडेच घडून आला त्याने अगोदरच संघटनात्मकदृष्ट्या विकलांग असलेल्या पक्षाला अजूनच अडचणीत आणून ठेवले आहे. जिल्हाध्यक्ष विरुद्ध नाराजीचे धुमारे फुटत आहेत. पक्षांतर्गत निवडणुकीतून तरुण फळी जी पुढे आली आहे तीच आशादायी आहे, पण तिला ज्येष्ठ मंडळी संधी देणार का हा प्रश्न आहे.

 

राष्ट्रवादीकडेही प्रभावशाली नेतृत्व नाही. स्वतःची स्पेस वाढवायची तर शिवसेनेसोबत जाण्याखेरीज त्यांच्याकडे चांगला पर्याय नाही, पण तसे होईलच याची शाश्वती नाही. वंचित आघाडी आरक्षित जागांव्यतिरिक्त लक्ष देताना दिसत नाही. पालकमंत्रिपदाचा आधार लाभल्याने प्रहार काही तरी अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात दिसते, पण जनाधार मिळवणे हे मेळावे घेण्याइतके सोपे नाही. एमआयएम सक्रिय झाली आहे, परंतु ती काँग्रेसलाच अडचणीची ठरण्याची चिन्हे आहेत. मनसे व आप या दोन्ही पक्षांची संघटनात्मक स्थितीही नाजूकच आहे. त्यामुळे अकोल्यात काय? हे आजच सांगता येऊ नये.

 

सारांशात, लांबलेल्या निवडणुकीचा लाभ सत्ताधाऱ्यांबरोबरच अन्य पक्षीयांनाही उचलता येणारा आहे, पण चाचपणीतच अडकलेल्यांकडून त्यादृष्टीने तयारी अगर नियोजन होताना दिसत नाही. तेव्हा ही वेळही निघून गेल्यावर जागे होण्याला अर्थ उरू नये.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूक