शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

झॉम्बी- पत्रकारितेमध्ये हे लचके तोडणे कुठून घुसले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 06:05 IST

टीव्ही रिपोर्टर्स सध्या जसे वागत आहेत  ते पाहून भीती, दु:ख वा दोन्ही वाटू शकते.  संतापही येऊ शकतो. पण ही  साथीच्या रोगाला अनुकूल अर्थव्यवस्था आहे. 

ठळक मुद्देआज भारताची लोकसंख्या एकशेएकोणतीस कोटी नव्वद लाख आहे आणि भारतीयांकडे चाळीस कोटी कॅमेरे आहेत. इतके जास्त कॅमेरे असणार्‍या लोकसंख्येत शिकलेसवरलेले लोकही छापलेले शब्द वाचायचे सोडून व्हिडिओच पहातात. 

- राहुल बनसोडे

इंग्रजी चित्रपटांमध्ये झॉम्बी सिनेमा नावाचा एक प्रकार असतो. काही कारणांमुळे माणसांच्या मेंदूवर परिणाम होतो आणि ते चवताळल्यासारखे रस्त्यावर इतस्तत: फिरू लागतात, समोर दिसेल त्याच्या नरडीचा घोट घेऊ पहातात, त्यांच्यातले माणूसपण जाऊन फक्त जनावर शिल्लक राहाते आणि ह्या जनावरांना उरलेल्या माणसांची भाषाच समजत नसल्याने ते नरभक्षक बनतात. तसे पहाता झॉम्बी मुव्ही हा फक्त मनोरंजनाचा भाग आहे; पण विषाणूंचे प्रदूषण झाले आणि समाजव्यवस्था कोसळली तर खूप मोठय़ा संख्येने माणसे अशी नरभक्षक बनू शकतात ज्याला ‘झॉम्बी अपोकोलिप्स’ म्हणतात. एरव्ही ही समजूत हास्यास्पद वाटली असती; पण सध्या भारतीय टीव्ही माध्यमांचे टीव्ही रिपोर्टर्स जसे वागत आहे ते पहाता भारतीय टीव्ही रिपोर्टिंग हे सध्या झॉम्बी अपोकोलिप्सच्या प्रारंभिक पायरीवर आहे असे दिसते.भारतीय टीव्ही चॅनलचे रिपोर्टर्स बातमी असेल तिथे गर्दी करतात. मुळात तिथे बातमी आहे हे त्यांना स्वत:हून गवसलेले नसते. बर्‍याचदा त्यांना त्या ठिकाणी धाडण्यात आलेले असते. बातमी घेत असताना, मिळवत असताना सामाजिक अंतर पाळलं जात असल्याचंही बर्‍याचदा दिसत नाही. मुंबईतल्या लोकलपेक्षाही जास्त गर्दी करीत फुटेज मिळवण्याचा प्रय} तिथे होताना दिसतो. या गर्दीत बहुतांश पुरुष असतात आणि अनेकदा बाइट घेण्याच्या नादात अक्षरश: चेंगराचेंगरी होत असते. कधीकधी तर हमरीतुमरीचेही प्रसंग येतात. त्या गर्दीत काहीवेळा स्रियाही बघायला मिळतात. सर्व जण त्या गर्दीचाच जणू भाग झालेले असतात. हे असे प्रसंग टीव्हीवर पाहताना आवाज म्युट केला आणि स्क्रीनवरच्या अक्षरांकडे दुर्लक्ष केले तर मागे उरलेली हलती चित्रे ही आपल्या देशातल्या पुरुषी अहंकाराचे जणू चित्र आहे की काय असे वाटते. या बातम्यांचा परतावा मग टीव्ही रिपोर्टर्सना मासिक पगाराच्या रूपात दिला जातो. काहीजण अशा बातम्या देण्यात जास्त यशस्वी झालेले असतात. त्यामुळे त्यांना थोडाफार बोनसही मिळतो; पण त्यांना कधीही वाजवीपेक्षा जास्त पगार दिला जात नाही. कारण असे केल्यास त्यांची ‘बातमी देण्याची’ क्षमता कमी होते.टीव्ही रिपोर्टर्स जसे वागत आहेत ते पाहून भीती वा दु:ख वा दोन्ही वाटू शकते. संतापही येऊ शकतो. पण ही साथीच्या रोगाला अनुकूल झालेली अर्थव्यवस्था आहे. साथीचा रोग हा एकदा व्यापाराचा मुख्य केंद्र बनला की त्यातून पैसे कसे कमवायचे हे लोकांना हळूहळू समजायला लागते वा नाइलाजास्तव इतर कुठल्या मार्गाने पैसा कमाविणे शक्य नसले तर लोक अशा विटाळलेल्या धंद्यात उतरतात.देशात सध्या काही ठिकाणी वापरून फेकलेल्या पीपीई किट्सची जबाबदारीने विल्हेवाट न लावता त्या किट्स पाण्याने स्वच्छ करून पुन्हा बाजारात विकण्याचे प्रकार होत असल्याच्या अनधिकृत बातम्या येत आहेत. असे वापरून फेकलेले दूषित किट्स गोळा करणारे काही हात आहेत, ते स्वच्छ करणारे काही हात आहेत आणि ते पुन्हा पॅक करणारेही काही हात आहेत. हे काम गटारीच्या चेंबरमध्ये उतरून सफाई करण्यापेक्षा जास्त धोकादायक आहे आणि तरीही पोटासाठी काही लोक हे काम करतायेत. केवळ पोटाची खळगी भरण्याकरिता माणसांना इतक्या खालच्या पातळीवर जाऊन काम करावे लागत असेल तर मग फक्त टीव्ही रिपोर्टर्सला दोष का द्यावा?एक देश म्हणून आपली टीव्ही माध्यमे अशा भयंकर परिस्थितीपर्यंत कशी येऊन पोहोचली? एकोणिसशे त्र्याऐंशी साली भारताची लोकसंख्या सत्तर कोटी होती आणि तेव्हा भारतात दहा लाख कॅमेरे होते. आज भारताची लोकसंख्या एकशेएकोणतीस कोटी नव्वद लाख आहे आणि भारतीयांकडे चाळीस कोटी कॅमेरे आहेत. इतके जास्त कॅमेरे असणार्‍या लोकसंख्येत शिकलेसवरलेले लोकही छापलेले शब्द वाचायचे सोडून व्हिडिओच पहातात. शब्द वाचण्यासाठी लागणारी थोडीशी मेहनत घेण्याची त्यांची तयारी नसते आणि आळशीपणातून सर्व माहिती मिळविण्यासाठी ते टीव्हीवरती अवलंबून राहातात. टीव्हीच्या न्यूज चॅनलवर दिसणारी हिंसक दृश्ये आणि भांडणे सतत पहात राहिल्यास त्याचा परिणाम शेवटी समाजावर होतो आणि असा समाज अस्थिर झाल्यास त्याचे अस्तित्वच धोक्यात येते. असा समाज स्वत:ला नष्ट होण्यापासून वाचवू शकत नाही.गेल्या पाच हजार वर्षांत अनेक ठिकाणी अनेक वेळा समाजव्यवस्था कोसळली; पण तिची कधीही कुठेही बातमी झाली नाही. समाजव्यवस्था कोसळण्याची बातमी होत नाही कारण अशी बातमी लिहिण्यासाठी, चित्रित करण्यासाठी, वाचण्यासाठी वा पहाण्यासाठी समाजच शिल्लक राहात नाही.

rahulbaba@gmail.com(लेखक समाजमाध्यमांचे अभ्यासक आहेत.)