आमच्या आई-बाबांचं काय?
By Admin | Updated: November 22, 2015 17:50 IST2015-11-22T17:50:41+5:302015-11-22T17:50:41+5:30
हिंमत दाखवून केलीच नव्या प्रवासाला सुरुवात, तर लगेच आई-बाबा विचारतात, ‘दोन महिन्यांत तुझी ही स्टार्ट अप कंपनी बंद पडली की मग काय करशील?’ - ‘एक मौका तो दिजिये फेल होनेका’ असं म्हटलं की लगेच तीर्थरूप कडाडतात, ‘बस, वही एक दिन तो हम देखना नही चाहते..’ - आयुष्यभराच्या झगडय़ाने तोंड पोळलेल्या जुन्या पिढीला आपल्या मुलांच्या वाटय़ाला अपयश येण्याची शक्यतासुद्धा सहन करता येत नाही. ते हे विसरतात की, पिढी बदलली, तसे आजूबाजूचे वास्तवही बदलले आहेच की!

आमच्या आई-बाबांचं काय?
>तरुण उद्योजक आणि त्यांच्या पालकांच्या पिढीचा संघर्ष
- रश्मी बन्सल
अनुवाद : ओंकार करंबेळकर
भारतातल्या अनेक तरुणांना आज स्वत:चं स्वप्न साकारायचं आहे. नोकरीतली टिपिकल खर्डेघाशी न करता स्वत:ला आजमावून पाहायचं आहे. त्यासाठी अमेरिका वगैरे परक्या देशात न जाता हे सारं आपल्या मातीतच आजमावून पाहायचं आहे. या वाटेवरून आज भारतातली हजारो तरुण पावलं चाललेली आहेत.
अर्थात हा प्रवास सोपा नव्हता आणि नाही.
ब:याच तरुणांच्या बाबतीत पहिला अडथळा आजही आहे आणि तोही घरातूनच!
हो, आपले आई-बाबा हा त्यांच्या मार्गातला पहिला अडथळा आहे. ‘नोकरीसारखा सिक्युअर मामला सोडून पळत्याच्या पाठीमागे पळून तोंडावर आपटून विषाची परीक्षा का घ्या?’ हा त्यांचा रोकडा सवाल आहे.
वेगळ्या वाटेनं जायची आमची तयारी आहेच, पण आई-बाबांना कसं मनवायचं हा या तरुणांपुढचा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्याबद्दल ते उघडपणो विचारतातही.
‘हे सगळं ठीक आहे हो. पण आमच्या आईबाबांचं काय? त्यांनी आम्हाला इतकं मोठं केलं, वाढवलं, आमच्यासाठी खस्ता खाल्ल्या, त्यांच्या आता अपेक्षा आहेत आमच्याकडून, त्यांच्या अपेक्षांचं काय?’
- द व्हायरल फिव्हरने केलेला ‘पिचर्स’चा एक एपिसोड यू टय़ूबवर दिसतो, त्यात याच ‘आईबाबांच्या अपेक्षांचे काय?’ सिंड्रोमची चर्चा आहे.
एक तरुण आंत्रप्रनर या घोळाचा सामना करतो आहे. त्याचे नाव जितू.
जितूच्या बाबांच्या मनामध्ये ही शंका बरेच दिवस असते,
की आपला मुलगा ऑफिसमध्ये नक्की जातो की नाही..? तो रात्री फार उशिरा येतो.. काय करतो, कोठे जातो याचा काहीच थांगपत्ता लागू देत नाही. तो नक्की जातो कुठे?
शेवटी मनाला सतावणा:या या प्रश्नांची तड लावायला जितूचे बाबा अचानक त्याच्या घरी येऊन थडकतात आणि व्योमकेश बक्षी स्टाइल तपासाला सुरुवात करतात.
आल्याआल्याच सूनबाईंना विचारतात,
‘सबकुछ ठीक तो है ना?’
सूनबाई हो म्हणतात, तरी या तीर्थरूपांचा विश्वास बसत नाही. त्यांना शंका असतेच- दालमें जरूर कुछ काला है! नक्की याचे बाहेर कोणा बाईबरोबर लफडे सुरू असले पाहिजे, नाहीतर हा एवढय़ा उशिरा जातो कुठे? करतो काय?
नशीब, जितूच्या बायकोला आधीच सगळे माहिती असते.
जितूने त्याच्या बायकोला विश्वासात घेऊन आपण नोकरी सोडून स्टार्ट अप टीममध्ये सहभागी झाल्याचे आधीच सांगितलेले असते.
नोकरी सोडण्याची हिंमत आहे, पण वडिलांना त्याबद्दल खरे सांगण्याची हिंमत नाही अशी जितूची अवस्था.
शेवटी न राहवून, नाइलाजाने जितूची बायको ती हिंमत करते आणि तपासाला आलेले व्योमकेश बक्षी कोसळतातच!
काही वेळाने- म्हणजे पुरेशा उशिराने जितू घरी येतो.
आल्या आल्या तो कुप्रसिद्ध यक्षप्रश्न तीर्थरूप त्याच्या तोंडावर अक्षरश: अस्त्रसारखा फेकतात,
‘‘दोन महिन्यांत तुझी ही स्टार्ट अप कंपनी बंद पडली की मग काय करशील?’’
- जितूची बायको थंड बसलेल्या जितूच्या मदतीला येते. म्हणते,
‘‘आलं अपयश तर आलं, एक मौका तो दिजिये इसे फेल होनेका!’’
तीर्थरूप कडाडतात,
‘‘बस, वही तो एक दिन हम देखना नही चाहते..’’
अपयश.
या शब्दातला असुद्धा आपल्याकडे कोणाला उच्चारायचा नसतो. विशेषत: जुन्या पिढीतल्या लोकांना.
आयुष्यभराच्या झगडय़ाने तोंड पोळलेल्या या पिढीला आपल्या मुलांच्या वाटय़ाला हे असले भलते काही येण्याची शक्यतासुद्धा सहन करता येत नाही.
- पण ते हे विसरतात की, पिढी बदलली, तसे आजूबाजूचे वास्तवही बदलले आहेच की!
साध्या टेलिफोनसाठीही दहा दहा वर्षे वाट पाहावी लागायची अशा काळात रखडलेल्या आईबापांची मुले मात्र दहा तासांच्या आत नवा मोबाइल अॅक्टिव्हेट करणा:या काळात जगतात आता!
जग बदलले आहे. या जगाने नव्या संधी आणल्या आहेत.
आपली मुले आता आपल्यासारखी एखाद्या सरकारी खात्यातून तीस-चाळीस वर्षे एकचएक नोकरी करून निवृत्त होणार नाहीत याची जाणीव आईवडिलांना होते, पण ती फार उशिरा!
ते स्वाभाविकही आहे म्हणा!
भविष्य अंधुक दिसत असते, तेव्हा माहितीच्या भूतकाळातले अनमान धपके धरून पुढे जावेसे वाटतेच!
हे गणित तोडू शकणारे फार थोडे. अपवादच!
माझा तुङयावर विश्वास आहे, जे करशील ते चांगलेच करशील - हे एक वाक्य म्हणायला मोठेच धाडस लागते. बहुतांश पालक गोंधळलेल्या आणि भीतीच्या मन:स्थितीतच सतत वावरत असतात. आणि अत्यंत थोडे आपल्या मुलांना जे हवे ते करू देण्यासाठी, निदान एकदा करून बघण्यासाठी आधार देऊ शकतात.
- असे पालक - मोजके असतील पण - आहेत, आणि या नव्या भारतात त्यांची संख्या वाढू लागली आहे!
2क्1क् साली प्रियदीप सिन्हा एमआयटी मणिपालमध्ये शेवटच्या वर्षाला शिकत होता. बिङिानेस प्लॅन बनवण्याच्या एका स्पर्धेत त्याने भाग घेतला.
- प्रियदीपला पहिले बक्षीस मिळाले.
नुसते बक्षीसच नव्हे, तर त्याने सादर केलेल्या प्लॅनमधला बिङिानेस प्रत्यक्ष सुरू करण्याची संधीही मिळाली. त्याच्या कॉलेजच्याच इन्क्यूबेटरमध्ये त्याला आपले स्वप्न साकारण्याची-वाढवण्याची-प्रत्यक्षात आणण्याची सोय झाली होती.
कॉलेजमध्ये शिकत असतानाच तो आंत्रप्रनर होणार होता. प्रियदीपने तत्काळ घरी फोन करून त्याच्या वडिलांना ही गोष्ट सांगितली, तेव्हा ते म्हणाले, हे तुङो आयुष्य आहे. आता तुङो निर्णय तूच घ्यायला हवेत.
दुस:याच दिवशी प्रियदीपला त्याच्या बॅँकेच्या खात्यामध्ये दीड लाख रुपये जमा झाले असल्याचे कळले. हे त्याच्या वडिलांनी त्याच्या नव्या बिङिानेससाठी दिलेले स्टार्ट अप कॅपिटल होते. बॅँकेत काम करणा:या माणसासाठी ही मोठीच रक्कम होती.
प्रियदीपच्या डोळ्यात पाणीच आले.
त्याचे स्वप्न सत्यात येण्यासाठी त्याला दहा महिने आधीच बीज भांडवल मिळाले होते.
खरेतर वडिलांकडून मिळालेल्या पैशांपेक्षा त्यांनी दिलेले नैतिक पाठबळ हेच त्याच्यासाठी कितीतरी मोठे भांडवल होते.
‘‘माङो आईवडील माङयासोबत उभे राहिले, लोक काय म्हणतील याची पर्वा न करता त्यांनी माङयावर विश्वास ठेवला याबद्दल मला किती कृतज्ञ वाटते, हे शब्दांत कसे सांगू?’’
- प्रियदीप मलाच विचारत होता. खरेच, त्याच्याकडे शब्द नव्हते.
आता प्रियदीपची ग्यान लॅब ही कंपनी मोठी होते आहे. आज त्याच्या कंपनीत पाच पूर्ण वेळ काम करणारे सहकारी आहेत. प्रियदीपच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 65 लाखांवर गेली आहे. आणि त्याच्या व्यवसायात नवी गुंतवणूकही येऊ घातली आहे.
पण प्रियदीपच्या आईवडिलांसारखी उदाहरणो सर्वत्र आहेत असे मात्र नाही. इतकेच नव्हे, तर गुजरातसारख्या ‘धंदा आमच्या रक्तामध्येच आहे’ असे म्हणणा:यांच्या राज्यातही फारशी वेगळी परिस्थिती नाही.
नोकरी करतच व्यवसाय करणा:या सनी पंडय़ाने जेव्हा आपल्या व्यवसायाची माहिती आईबाबांना दिली, तेव्हा त्यांना ते अजिबात रुचले नाही.
‘‘आपल्या घराण्यात व्यवसायात आजवर कोणीच यशस्वी झाले नाही, तू कशाला या भानगडीत पडतोस?’’ - ही नेहमीची ऋचा ऐकवून त्यांनी नोकरीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला वजा आदेशच सनीला दिला.
- अखेरीस सनीने नोकरी सांभाळून व्यवसाय चालू ठेवण्याचे ठरवल्याने त्यांच्या विरोधाची धार थोडी बोथट झाली, एवढेच!
सनीचा आटापिटा सुरू झाला.
दोन डगरींवर पाय ठेवून चालायचे होते.
या तरुण उद्योजकाने काही प्रोफेशनल्स हायर केले, त्यांना कामे वाटून दिली आणि आपण आपल्या जॉबवर जात राहिला. पण कशालाच वेग येईना. त्याची कंपनी त्याला हवी त्या वेगाने वाढत नव्हती. त्याने ठरवलेल्या दिशेने जाणो तर शक्यच नव्हते.
- आणि सनी कुठेच जीव ओतून काम करू शकत नव्हता.
ना त्याच्या स्वत:च्या कंपनीसाठी, ना तो जिथे नोकरी करत होता त्या कंपनीसाठी!
आपण कुणालाच, कशालाच धड न्याय देत नाही याचा अपराधगंड अखेर सहन होईनासा झाला, तेव्हा आईवडिलांना अंधारात ठेवून त्याने नोकरीचा राजीनामा दिला.
‘‘उनके पीस ऑफ माइण्डके लिए झूठ बोलना पडा, क्या करता मै? सॉफ्टवेअर इंडस्ट्री क्या होती है उनको मालूमही नही है, और कैसे समझाता मैं?’’ - सनी विचारतो.
सनीने व्यवसायात पूर्णवेळ लक्ष घातल्यावर मात्र त्याच्या क्विक्सन टेक्नालॉजी या कंपनीची भरभराट झाली. केवळ 18 महिन्यांच्या कालावधीत कर्मचा:यांची संख्या तीनवरून पंचवीसवर गेली आणि त्या वर्षात त्याने एक कोटी रुपयांचे उत्पन्न कमावले.
- हे यश दिसले, तेव्हा कुठे सनीच्या वडिलांना वाटले की; अच्छा, डिक्रा कुछ अच्छा कर रहा है!
मुलाने त्यांचा विश्वास कमावला आणि त्याच्या यशाबरोबर भविष्याची भीतीही मग गायब झाली.
‘‘उसका बिङिानेस तो अब चल गया है, अगर नहीं चलता तो भी कुछ ना कुछ ढंग का करही लेगा’’ - सनीचे वडील आता सांगतात, तेव्हा त्यांच्या स्वरात कौतुक असते, आणि विश्वासही!
गंमत म्हणजे, हाच फंडा सनीने त्याच्या लग्नाच्या बाबतीतही वापरला. दुस:या जातीच्या मुलीवर आपले प्रेम आहे याचा त्याने घरात थांगपत्ता लागू दिला नाही. दोघेही आपापल्या व्यवसायात नीट स्थिरस्थावर होऊन उत्तम कमाई करू लागल्यावरच सनीने आपल्या लग्नाचा विषय घरात काढला.
कोणत्याही अडथळ्याविना त्याचे शुभमंगल झालेच आणि वरून भरभरून आशीर्वादही मिळाले.
‘‘म्हणजे प्रत्येकानेच आपल्या आईवडिलांपासून गोष्टी लपवून ठेवाव्यात असे नाही; मात्र ते फारच हट्टी असतील आणि तुमचा तुमच्यावर विश्वास असेल, तर हे लपविण्याचे तात्पुरते पाप करायला काहीच हरकत नाही’’ - असे हितेश आज गमतीत सांगतो. ही सगळी मध्यमवर्गातील, सुशिक्षित स्तरातील उदाहरणो झाली. मात्र काही आंत्रप्रनर्स याहून कठीण, गरिबीच्या आणि अभावाच्या पाश्र्वभूमीतून येऊन मोठे झालेले आहेत.
आनंद शिरसाट अशाच काही लोकांपैकी एक. त्याचे आईबाबा तर पाथर्डीमध्ये शेती करतात. ते अजिबात शिकलेले नव्हते की त्यांनी कधी लॅपटॉप पाहिला नव्हता. पण त्यांनी आनंदला इंजिनिअर व्हायला आणि नंतर स्वत:चे स्टार्ट अप सुरू करायला पूर्ण पाठिंबा दिला.
आनंद म्हणतो, ‘‘मी माङो कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले खरे, पण शिकत असताना काहीतरी वेगळे करण्याचा विचार माङया मनात येत असे.’’
मग त्यानेही या वेगळे काहीतरी करण्याच्या कल्पनेला न्याय दिला. नाशिकमध्येच त्याने अॅरेटे टेक्नॉलॉजी नावाची कंपनी स्थापन केली. यावेळेसही त्याच्या आईबाबांनी त्याला भक्कम साथ दिली. कारण, तो नक्की काय करतो हे त्यांना नीट माहितीही नव्हते.
‘काय करतो तुमचा मुलगा?’ - असा साचेबंद प्रश्न कुणी विचारला की त्याचे बाबा म्हणतात,
‘‘काहीतरी करतो.. टीव्ही, पेपरात असतो सारखा.’’
(त्याच्या कंपनीची माहिती, त्याची यशोगाथा मीडियामध्ये छापून येते.)
आनंद आपल्या आईबाबांवर भारीच खूश आहे.
ते फार विचार करत नाहीत. त्यांचा आपल्या लेकावर पूर्ण विश्वास आहे, एवढेच!
पालक कमी शिकलेले किंवा निरक्षर असतील, तर मुलांकडून असलेल्या अपेक्षांच्या बाबतीत ते फार आग्रही नसतात. आपण जे करू त्याला पाठिंबा देतात, असा आनंदचा अनुभव आहे.
(रश्मी बन्सल : तरुण भारतीय उद्योजकांच्या प्रेरणादायी
कथा सांगणा:या सात पुस्तकांच्या मालिकेच्या
लोकप्रिय लेखिका.
विद्यार्थिदशेतच उद्योजक होणा:या मुलामुलींच्या प्रवासाचा
वेध घेणारे ‘अराइज अवेक’ हे त्यांचे नवे पुस्तक.)