शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

... आता इथून पुढे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 06:10 IST

अंतराळ विज्ञानात आणि तंत्रज्ञानात आपण खूप प्रगती केली असं वाटून थांबण्याचे टप्पे कधी येत नाहीत.

ठळक मुद्देआजच्या घडीला अमेरिका आणि चीन यांची अंतराळ विज्ञानातील प्रगती आपल्यापेक्षा खूप जास्त आहे. आपल्याला त्या दिशेनं जायचं आहे.

- तपन मिश्रा(अहमदाबाद स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर येथे कार्यरत भारताचे रडार मॅन!... इस्रो चेअरमनचे वरिष्ठ सल्लागार)साधं गणित आहे, आपल्याकडे ताकद आहे पण ती ताकद खरंच आहे का, किती आहे हे जगाला कधीतरी दाखवावं लागतं आणि जगानं ते मान्यही करावं लागतं.भारतानं ‘अ‍ॅन्टी-सॅटेलाइट मिसाइल’ म्हणजेच उपग्रहविरोधी क्षेपणास्राची चाचणी यशस्वी करून जगाला हे दाखवून दिलं आहे की, आमच्याकडे हे तंत्रज्ञान आहे. आम्ही ते स्वसंरक्षणासाठी सिद्ध केलेलं आहे. आणि जगासमोर आपलीही क्षमता सिद्ध करणारं हे यश म्हणजे भारतीय शास्रज्ञांनी घेतलेली एक मोठी अभिमानास्पद झेप आहे.एक उदाहरण सांगतो, एक मोठ्ठा हॉल आहे आणि त्या हॉलच्या एका टोकाला एक माणूस उभा आहे, दुसऱ्या टोकाला दुसरा माणूस उभा आहे. आता आपण एका माणसाला सांगतोय की तुझ्या हातात जी टाचणी आहे, ती तू हवेत उडव आणि दुसऱ्याला सांगतो की तू गणित बांधून, वेगाचा अभ्यास करून अत्यंत अचूकतेनं ती टाचणी हवेतच मारायची आहे..विचार करा हे काम सोपं आहे का?अचूकता आणि वेगाचं हे गणित आहे, ज्यासाठी प्रचंड मेहनत आणि अभ्यास लागतो. तंत्रज्ञानही लागतं. आपल्या शास्रज्ञांनी आपल्या क्षमता आणि तंत्रज्ञानावर शिक्कामोर्तब केलं आहे.या क्षमतांचा वापर राष्ट्र आक्रमक होण्यासाठी करत नसतात. मात्र ज्याला ‘डिटरण्ट’ अर्थात प्रतिबंधात्मक क्षमता म्हणतात त्या आपल्याकडे असणं ही नव्या काळात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.संरक्षण, प्रतिबंधात्मक क्षमता हे तर महत्त्वाचं आहेच मात्र या गोष्टींचा अजून एक महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे आर्थिक सुरक्षितता आणि गुंतवणुकीचा. आर्थिक सत्ता बनायचं असेल तर या काळात तुमच्याकडे तंत्रज्ञानाची ताकद हवी. जगभरातले लोक भारताच्या अंतराळ तंत्रज्ञानावर विश्वास ठेवतात कारण आपण त्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. त्यातून आर्थिक गुंतवणुकीलाही चालना मिळते आणि तंत्रज्ञानालाही. त्यामुळेच अशाप्रकारची डिटरण्ट क्षमता आपल्याकडे असणं ही नव्या काळात मोठी कमाई आहे. डीआरडीओनं केलेली ही कामगिरी म्हणून अत्यंत अभिमानास्पद आणि भारताच्या प्रगतीला पोषकपूरक ठरणारी आहे.अंतराळ विज्ञानात आणि तंत्रज्ञानात आपण ‘कमावलं’ किंवा खूप प्रगती केली असं वाटून थांबण्याचे टप्पे कधी येत नाहीत. आता याहून पुढं जायचं आहे हे ध्येय सतत खुणावत असतंच. आजच्या घडीला अमेरिका आणि चीन यांची अंतराळ विज्ञानातील प्रगती आपल्यापेक्षा खूप जास्त आहे. आपल्याला त्या दिशेनं जायचं आहे. तंत्रज्ञानदृष्ट्या सक्षम होत अधिक अचूक काम करायचं आहे. अंतराळ विज्ञानातील सत्ता आणि आर्थिक सत्ता यांचा ध्यास असेल तर आपल्याला अजून मोठा टप्पा गाठायचा आहे.(मुलाखत आणि शब्दांकन : मेघना ढोके)