'Talking' pictures! | ‘बोलणारी’ चित्रं!

‘बोलणारी’ चित्रं!

ठळक मुद्देबदलत जाणार्‍या काळात मानवी प्रगतीच्या टप्प्यांवर अनेक नवीन भाषांचा जन्म झाला आणि नवीन संस्कृती उदयास आल्या; पण चित्नलिपी अबाधित राहिली.

- हृषीकेश खेडकर
बोलणारी चित्नं कधी पाहिल्याचं तुम्हाला आठवतंय? अशी चित्नं जी तुमच्या दैनंदिन आयुष्यात कुठे चालावं, कुठे बसावं, कुठे वळावं, काय करावं, काय करू नये याचं सतत मार्गदर्शन करत असतात? 
- डोळ्यांसमोर काही चिन्हं दिसायला लागली असतील ना ! बोलणार्‍या चिन्हांचा हा संवाद आपल्याशी कसा आणि कधी चालू झाला हे मी तुम्हाला आजच्या डिझाइनच्या गोष्टीतून सांगणार आहे. हजारो वर्षांपूर्वी मानव उत्क्रांतीच्या विकसनशील टप्प्यात आपण दगडांवर चित्न काढायला लागलो. 
प्राणी, पक्षी, निसर्गात आढळणार्‍या नानाविध गोष्टी दगडावर रेखाटत आपण काही आकृतिबंध तयार करू लागलो. या आकृतिबंधातून तयार झाली ती ‘चित्नलिपी’; एक चिन्ह सांकेतिक भाषा ज्यातून माणूस लिखित स्वरूपात व्यक्त करायला शिकला. 
मानव वास्तव्य करत असलेल्या गुहांमध्ये सापडणारी ही चित्नलिपी विकसित होत प्राचीन सुमेरियन, इजिप्शिअन आणि चिनी संस्कृतींमधून बघायला मिळते. आजही आफ्रिका आणि अमेरिका खंडात तसेच ओशियानिया भागातील काही बेटांवर ही चित्नलिपी संवादासाठी प्राथमिक चिन्ह संकेत म्हणून वापरली जाते. बदलत जाणार्‍या काळात मानवी प्रगतीच्या टप्प्यांवर अनेक नवीन भाषांचा जन्म झाला आणि नवीन संस्कृती उदयास आल्या; पण चित्नलिपी अबाधित राहिली. 
सकाळी उठल्यावर लागणार्‍या टूथपेस्टच्या पॅकेजिंगपासून, रात्नी झोपताना बघितलेल्या मोबाइलच्या आयकॉन्सपर्यंत दिवसभरातल्या प्रत्येक टप्प्यावर कुठे ना कुठे ही चित्नलिपी कायम आपल्याशी संवाद साधत असते. रोज दिसणारी चित्नंच ती; पण सांकेतिक भाषेचा लहेजा जपत ही चिन्हं आपलं जग सुसह्य आणि सुटसुटीत करत असतात. नमुन्यादाखल आपण रोजच्या जीवनात मार्ग शोधण्यासाठी म्हणजेच ‘वे-फाइडिंगसाठी’ या संकेत चिन्हांचा कसा वापर करतो हे बघूयात. 
रस्त्याच्या कडेला दिशादर्शक संकेत देण्याची सुरुवात 1648 साली ब्रिटनमध्ये एका कायद्याने चालू झाली. कायदा होता प्रत्येक परगाण्याच्या (कौंटीच्या) वेशीबाहेर त्याच्या नावाचा फलक लावणे. आधुनिक दिशादर्शक संकेत चिन्हांची मुळं सापडतात ती अठराव्या शतकात जेव्हा युरोपमध्ये सायकलस्वारांसाठी अवघड वळणे आणि तीव्र उतार दर्शवणारी चिन्हे रस्त्याच्या कडेला लावली गेली. फुली दर्शवणारी दोन हाडे आणि माणसाची कवटी असणारे धोक्याचे चिन्ह पहिल्यांदा युरोपातील घाट रस्त्यात वापरले गेले. 
लोखंडी खांबावर लाकडात कोरून सरसकट काळ्या रंगात रंगवलेली ही चिन्हं युरोपातल्या प्रत्येक रस्त्यावर दिसू लागली. या नंतरचा काळ होता तो मोटार गाडीचा. 1915 साली अमेरिकेतील क्लिव्हलॅण्ड या शहरातील रस्त्यांवर सर्वप्रथम लाल, पिवळा आणि हिरवा हे तीन सर्वमान्य रंगाचे विद्युत सिग्नल बसवण्यात आले. औद्योगिक क्रांतीनंतर अमेरिकेतील रस्त्यांवर वाढणारी रहदारी बघता या चिन्हांमध्ये सुसूत्नता आणण्याची आत्यंतिक गरज जाणवू लागली. 
1922 साली मिनेसोटा, विस्कॉन्सिन आणि इंडियाना या तीन प्रांतातील काही लोकांनी मिळून या गोष्टीवर तोडगा काढला आणि जगातली पहिली रस्ते सुरक्षा चिन्ह प्रणाली अस्तित्वात आली. यातील काही ठळक चिन्ह संकेत म्हणजे चालकाच्या पटकन लक्षांत येणारे चिन्ह फलकाचे आकार जसे की रेल्वे क्रॉसिंगसाठी त्रिकोणी फलक, थांबण्याच्या संकेतासाठी अष्टकोनी फलक, वेग र्मयादा किंवा दिशादर्शनासाठी गोल फलक इत्यादी.
पुढील काळात माणसाच्या आकलन क्षमतेच्या वैज्ञानिक अभ्यासातून चिन्हांसाठी वापरले जाणारे रंग, चिन्हांमधील अक्षर आणि अंकांचे आकार, वापरल्या जाणार्‍या खुणांचे व्यापक अर्थ इत्यादी गोष्टींमधून ही चिन्ह संकेत प्रणाली विकसित होत गेली. या अभ्यासात एक गोष्ट अशीही लक्षात आली की चित्नलिपीचा वापर हा माणसाच्या संस्कृतीनुसार आणि तो राहत असलेल्या वातावरणानुसार बदलतो. उदाहरणार्थ एखाद्या संस्कृतीतील प्रचलित पोषाखानुसार मनुष्य आणि स्री दाखवण्याचे चिन्ह संकेत बदलतात. चिन्ह संकेत डिझाइन करताना ते; बघणार्‍याची शैक्षणिक पात्नता, त्याची संस्कृती किंवा तत्सम कोणतीही वैयक्तिक पार्श्वभूमी यापलीकडे जाऊन संवाद साधण्याचा दृष्टीने कसे सर्वसमावेशक करता येईल हे सगळ्यात मोठं आव्हान ग्राफिक किंवा कम्युनिकेशन डिझाइनर पेलत असतो. 
आधुनिक जगात आपल्या शहरातील रस्ते, शॉपिंग मॉल, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, सार्वजनिक ठिकाणे इत्यादी गोष्टींमधून तयार झालेल्या जटिल प्रणालीतून आपण रोज वावरत असतो; अशावेळेस तर उत्कृष्ट दिशादर्शक चिन्ह संकेतांचे महत्त्व अजून जाणवते. 
बोलणार्‍या चिन्हांची आजची गोष्ट ‘ऑलिम्पिक’ या जागतिक सोहळ्याच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ऑलिम्पिक सोहळ्याची परंपरा तशी खूप जुनी; पण 1964 साली, म्हणजे जागतिक पर्यटन ही नित्याची बाब होती तेव्हा जपान येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी आयोजकांना पडलेला पहिला प्रश्न म्हणजे जगभरातून येणार्‍या क्रीडाप्रेमींना जपानी भाषा तर समजणार नाही, अशावेळी या पर्यटकांना शहरात फिरताना किंवा प्रवास करताना अडथळा येऊ नये म्हणून कत्सुमी मसारू या डिझायनरने दिशादर्शक चिन्ह संकेत वापरून पर्यटकांसाठी एक नॅव्हिगेशन प्रणाली तयार केली. 
जागतिक क्रीडा सोहळ्यात दिशादर्शक म्हणून वापरल्या जाणार्‍या चिन्ह संकेतांच्या शृंखलेत जगप्रसिद्ध र्जमन डिझाइनर ओटल ऐशर याने अत्यंत नावाजलेल्या चिन्ह संकेत प्रणालीची निर्मिती करून कळस रचला. 1972 साली म्युनिक येथे आयोजित केलेल्या ऑलिम्पिकसाठी त्याने बनवलेली प्रणाली आज चिन्हांकित दिशादर्शनाच्या क्षेत्नात लँडमार्क समजली जाते. विशिष्ट आकृतिबंधात घडवलेली, ठळक तपशिलात मांडलेली आणि व्यावहारिक दृष्ट्या संवाद साधण्यास अत्यंत सोपी अशी ऐशरने बनवलेली चित्नलिपी आधुनिक चिन्ह संकेत शैलीचे व्याकरण मानली गेली. 
आजही एखाद्या रेस्टॉरंटमधील टॉयलेट बाहेरील चिन्हापासून विमानतळावरच्या संपूर्ण चिन्ह संकेत प्रणालीवर ओटल ऐशरच्या डिझाइनची छाप बघायला मिळते. चिन्हांच्या या भाषेची एक गंमत म्हणजे बहुतांशी वेळेला जेव्हा ही चिन्हे संवाद साधण्यास असर्मथ ठरतात  किंवा बघणार्‍याला गोंधळात टाकतात तेव्हाच आपल्याला उत्कृष्ट चिन्ह संकेताचे महत्त्व कळते. रोज आपल्याला दिसणारे हे संकेत खरोखर किती गोष्टी सांगून जातात. 


hrishikhedkar@gmail.com
(लेखक वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)

Web Title: 'Talking' pictures!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.