शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रगल ? - तो आहेच !

By admin | Updated: July 22, 2016 17:55 IST

१९९१ पूर्वीच्या भारतात मराठी मध्यमवर्गीयतेच्या चाकोऱ्या तोडून, नोकरीचं रिंगण नाकारून स्वत:चा व्यवसाय उभा करण्यासाठी झगडलेले विवेक भालेराव हे पुण्यातल्या ‘लोगोमन एनर्जी सिस्टीम्स’चे संस्थापक संचालक.

 अदिती भालेराव

१९९१ पूर्वीच्या भारतात मराठी मध्यमवर्गीयतेच्या चाकोऱ्या तोडून, नोकरीचं रिंगण नाकारून स्वत:चा व्यवसाय उभा करण्यासाठी झगडलेले विवेक भालेराव हे पुण्यातल्या ‘लोगोमन एनर्जी सिस्टीम्स’चे संस्थापक संचालक. त्यांच्या मुलीने- अदितीनेही रिंगण तोडलं आणि फॅशन डिझायनिंगच्या जगात ‘सोलेल्’ ही स्वत:ची नाममुद्रा रोवण्यासाठी ती व्हाया लंडन पुण्यात परतली आहे. भालेराव म्हणतात, आम्हीही हिंमत केलीच, पण या मुलांचा काळ त्यांना थेट उड्याच मारू देतो!बाबाची पिढी पंचविशीत असताना त्याच्याकडे असंं काय होतं जे आज तुझ्याकडे नाही? तुला त्याची रुखरुख वाटते का?- ‘काही नाही’ असं खरं तर काही नाही. सगळंच आहे माझ्याकडे. बाबाच्या पिढीसाठी साधी माहिती मिळवणं हेच एक मोठं काम होतं. कुठल्याही कामाची, विषयाची, आपल्याला उपयोगी पडू शकतील अशा माणसांची माहिती मिळवणं हे त्यांच्यासाठी अतीव कटकटीचं, अडथळ्यांचं होतं. त्यासाठी त्यांच्या नशिबी फार झगडा आला. त्या पिढीने हे अपरिहार्य कष्ट घेऊन सगळं स्वत: शोधलं, पण म्हणून त्यांचे पाय भक्कम रुजत गेले असं वाटतं मला. माझ्यासाठी फार सोप्या आहेत गोष्टी आणि खूप जास्तही! खूप माहिती, असंख्य पर्याय आणि निवडीचं स्वातंत्र्य यामुळे निवड आणि निर्णय या दोन गोष्टी मात्र आमच्यासाठी सोप्या नाहीत. बाबाच्या पिढीकडे जो संयम होता तो आमच्याकडे जरा कमी आहे असं मला वाटतं! शिवाय आम्ही सहज-सोप्या उपलब्धतेला इतके सोकावलो आहोत, की वरवरच्या माहितीने, तात्पुरत्या ज्ञानाने काम भागवण्याचे शॉर्टकट आम्हाला माहिती असतात. जमतातही; पण त्यामुळे माझी पिढी काहीशी उथळ ठरते आहे की काय, अशी भीती मला कधीकधी वाटते.बाबाची पिढी पंचविशीत असताना त्याने बिझनेससाठी केलेला स्ट्रगल आणि तुझा स्ट्रगल यात काय फरक आहे? परिस्थिती बदलल्याने तुला बाबापेक्षा अ‍ॅडव्हाण्टेज मिळाला असं वाटतं का?- माझ्या बाबाच्या पिढीचा स्ट्रगल हा ‘सर्व्हायवल’चा अर्थात जगण्याचाच होता. मला ‘जगण्याचे’ प्रश्न नाहीत, कारण कनिष्ठ मध्यमवर्गातून वर सरकलेल्या माझ्या आईवडिलांनी ते प्रश्न सोडवलेले आहेत. माझा झगडा ‘टिकून राहण्या’चा असणार आहे. त्यामुळे माझी सुरुवात स्थैर्यातून, सुस्थितीतून होत असली, तरी पुढची वाट चालणं माझ्यासाठी सोपं नसणार, हे मला कळतं.आज मला प्रचंड अ‍ॅडव्हाण्टेज आहे. घरच्यांचा पाठिंबा, आर्थिक पाठबळही आहे. मी व्यवसायाला सुरुवात करताना आर्थिक पाठबळाची चैन मला मिळाली. बाबा झगडत वर आला. शिवाय त्याच्या पिढीच्या अनुभवाची शिदोरीही आयतीच माझ्या वाट्याला आली. हे सगळे अ‍ॅडव्हाण्टेज अमूल्यच आहेत.फक्त एवढंच की, त्याने माझे प्रश्न सोपे होत नाहीत. कारण नव्या काळाने नव्या अ‍ॅडव्हाण्टेज बरोबर नवे प्रश्नही माझ्यासमोर ठेवले आहेत. माझ्यासमोर प्रचंड वेगाने गरगरणारी स्पर्धा आहे. त्या वेगाचा हात धरून भोवऱ्यात उतरण्याचा अनुभव माझ्या बाबाने दिलेल्या शिदोरीत नाही.. कारण, तो माझा मलाच घ्यावा लागणार आहे. आज भारतापेक्षा जगाच्या अन्य कुठल्या भागात असणं तुला जास्त आवडलं असतं? हो तर का? नाही तर का नाही?- नाही!! मी खऱ्या अर्थानं पूर्ण भारतीय आहे. भारतापलीकडे कुठं जाऊन तिथे कायमचं राहणं हे आजतरी मला माझ्यासाठी महत्त्वाचं वाटत नाही.मी लंडनमध्ये शिकायला गेले. तिथे राहण्याचा अनुभव मिळवला. (बाबाच्या कृपेने) मी इतरही जगात खूप फिरले. त्या प्रवासामुळेच असेल कदाचित, पण मला भारतातच राहायला आवडेल हे माझं मलाच कळलं.फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात स्वत:चा ‘सोलेल्’ हा नवा ब्रॅण्ड निर्माण करण्याची सुरुवात मी पुण्यातूनच केली आहे. इथंच काम करणं, व्यवसाय करणं, वाढवणं हे सारंच मला करायचं होतं. बदलत्या आर्थिक पर्यावरणात भारतात व्यावसायिक संधी आहेत हे खरंच. पण माझा भारतातच राहण्याचा निर्णय असा पूर्ण ‘व्यावसायिक’ नाही. तो भावनेचाही आहे. भारतात राहणं, इथली जीवनशैली, इथलं माझं जगणं हे सारंच मला हवं आहे. मी व्यवसाय देशात करीन, देशाबाहेरही जाऊन करीन, पण राहीन इथेच!इथेच माझी मुळं आहेत, असं मला नक्की वाटतं.