शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

भुसभुशीत स्पर्धा, पार्ट्या, ड्रग्ज आणि स्वैराचार यांनी घेरलेल्या बॉलीवुडच्या पोकळ डोलार्‍याची कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 06:05 IST

सिनेसृष्टीच्या ग्लॅमरने बाहेरच्यांचे डोळे  कायमच विस्फारलेले असले, तरी आत शिरलं की हे जग इतकं पोकळ का असतं?

ठळक मुद्देपोकळ सिनेमांचा हा भुसभुशीत डोलारा कोरोनापूर्व काळातच कोसळायला लागला होता. कोरोनाउत्तर काळातल्या समीकरणांमध्ये तो भुईसपाट होण्याचीच शक्यता अधिक आहे.

- मुकेश माचकर

अभिनेते अशोक कुमार एका सिनेमाच्या सेटवर सआदत हसन मंटोंना सांगत होते, मला बाँबे टॉकीजमध्ये नोकरी मिळाली, तेव्हा पगार होता महिना 75 रुपये. सिनेमात काम करायला सांगितलं तेव्हा तो दीडशे रुपये झाला. सिनेमा हिट झाल्यावर तो 250 रुपये झाला. तेवढी रक्कम हातात आली तेव्हा मला मालाडच्या जंगलातल्या एका खोलीच्या घरात रात्रभर झोप आली नाही. चोरदरोडेखोरांच्या भीतीने ते पैसे उशाखाली ठेवून झोपलो होतो. सकाळी ते पोस्टात भरून आलो तेव्हा जिवात जीव आला.हे अशोक कुमार मंटोंना सांगत होते, तेव्हा त्यांच्यासमोर एका सिनेमाचं करारपत्र होतं, निर्माता 80 हजार रुपये द्यायला तयार होता, अशोक कुमार एक लाख रुपयांवर अडून बसले होते.स्टुडिओ सिस्टममधून स्टार सिस्टम किती वेगाने तयार झाली, त्याचं हे उदाहरण. अशोक कुमार यांच्या या वाटेवरून नंतरचे सगळे स्टार-सुपरस्टार चालत गेले. सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात, स्टुडिओ-बॅनर-दिग्दर्शक यांना महत्त्व होतं, कलावंत मंडळी दुय्यम होती. नंतर त्यांना पडद्यावरची आपल्या प्रतिमेची जादू, प्रेक्षकांना खेचण्याची ताकद लक्षात आली आणि ते स्टुडिओतून फुटून कॉन्ट्रॅक्ट करून मोठी किंमत मागू लागले. एक काळ असा होता की मल्टिस्टारर सिनेमाचं 75 टक्के बजेट निव्वळ स्टार्सच्या मानधनांचं असायचं आणि उरलेल्या 25 टक्क्यांत बाकीचा सगळा खर्च बसवला जायचा. पडद्यावरच्या प्रतिमांची मोहिनी जशी वाढत गेली, तसा हा उद्योग ग्लॅमरस, दिखाऊ व्हायला लागला. एकेकाळी अकुलीन स्रियांचाच मोठा वावर असल्याने या उद्योगाने शुचितेच्या कल्पना फारशा पाळल्या नव्हत्या. नंतरही त्याचा कासोटा सैलच राहिला होता. आता मात्र भूमिका मिळवण्यासाठी अभिनेत्रींना कसली किंमत मोजावी लागेल, याचीही गणितं ठरू लागली. नायकांच्या रंगेलबाजीच्या कहाण्या उघड चर्चिल्या जायच्या, बाकीचे दैहिक व्यवहार त्यामागे झाकले जायचे.या सृष्टीच्या ग्लॅमरने तेव्हाच्या माफियांना खेचून आणलं. मधुबालेच्या प्रेमात पागल झालेल्या हाजी मस्तानने तिच्यासारख्या दिसणार्‍या सोनाशी लग्न केलं आणि तिच्यासाठी सिनेमे काढले. अंडरवल्र्डचा पैसा अधिकृतपणे इंडस्ट्रीत येण्याची ही पहिलीच वेळ. हाजी मस्तानचे हिंदी सिनेमात बडे बडे मित्र तयार झाले, तो सेलिब्रिटी डॉन बनला, त्याच्या ‘संघर्षा’वर ‘दीवार’ निघाला. हिंदी सिनेमाच्या अंडरवल्र्डबरोबरच्या प्रदीर्घ प्रेमप्रकरणाची ही सुरुवात होती. हिंदी सिनेमाला अधिकृतपणे फायनान्स मिळण्याची व्यवस्था 2002 सालापर्यंत झाली नव्हती. त्यामुळे काळा पैसा, अंडरवल्र्डचा पैसा, रोखीचे व्यवहार यांचा त्यात सुळसुळाट होता. 1970 आणि 80च्या दशकात भक्कम झालेल्या अंडरवल्र्ड आणि हिंदी सिनेमाच्या संबंधांचं विक्राळ स्वरूप मुंबईतल्या बॉँबस्फोटांनंतर संजय दत्तच्या अटकेने उघड झालं. तोवर अंडरवल्र्डची मुंबईच्या सिनेमासृष्टीवर अशी पकड बसली होती की मोठय़ात मोठय़ा स्टारलाही दुबईत दाऊद बोलावेल तेव्हा जाऊन त्याचं ‘मनोरंजन’ करावं लागायचं, त्याचा पाहुणचार स्वीकारावा लागायचा.अनेक उभरत्या तारकांनीही दाऊदच्या आर्शयाला जाऊन दुबईतून सेटिंग जमवून सिनेमात कामं मिळवली. 2000 सालाच्या आसपास अंडरवल्र्डची मगरमिठी सैलावायला लागली, आता भाई लोक बिल्डर वगैरे बनले होते, कारण, आता रिअल इस्टेट ही सोन्याचं अंडं देणारी कोंबडी बनली होती. मुंबईत पोलिसांनी अंडरवल्र्डचं कंबरडं मोडलं होतं (म्हणजे दोन टोळ्यांच्या सुपार्‍या घेऊन दोन्हीकडचे गुंड उडवले होते, असं माहीतगार सांगतात.)ङ्घ आता चित्रपटसृष्टीवर खानत्रयीचं राज्य आलं, बँकिंगच्या माध्यमातून सफेद पैसा येऊ लागला, अमिताभच्या एबीसीएलचा प्रयोग फसला तरी त्याने चित्रपटसृष्टीला कॉर्पोरेट बनवण्याची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यातूनच खान मंडळींनी आणि त्यांच्यानंतरच्या स्टार्सनी सिनेमाकलेच्या सगळ्या बाजू आपल्या ताब्यात राहतील, असे प्रय} सुरू केले (यांच्या पाकिटात दिलीप कुमारचा फोटो असणार !) स्वत:च्या प्रॉडक्शन हाउसमध्येच नव्हे तर इतरांच्या सिनेमांतही त्यांचा डिस्ट्रिब्युशनपर्यंत सगळीकडे वाटा असतो. या मॉडेलने एकेकाळी ब्लॉकबस्टर दिले, नंतर तेवढेच मोठे भोपळे फोडले. एकट्या आमीरची झाकली मूठ अजून तरी सव्वा लाखाची उरली आहे. 100 कोटींचा क्लब, 200 कोटींचा क्लब अशा यशाच्या उंच शिड्या यांनीच तयार केल्या. धर्मा, यशराज, संजय लीला भन्साळी यांच्यासारख्या सर्जकांनी 500 रुपयांचं तिकीट आणि 500 रुपयांचं खानपान असा खर्च करू शकणार्‍या वर्गासाठी आठवड्या-दोन आठवड्यांत एवढा मोठा गल्ला गोळा करणार्‍या भव्य-भुसभुशीत व्यावसायिक सिनेमांचा डोलारा उभा केला.या प्रॉडक्शन हाउसेसची एकंदर व्यवसायावरची मक्तेदारी, त्यांनी पोसलेली घराणेशाही, कंपूशाही या सगळ्यांमधूनही अनेक बाहेरचे गुणवान कलाकार इथे येऊन अजूनही यशस्वी होतातच. मग त्यांना या बॅनर्सचा कृपाशीर्वाद देऊन कळपात ओढलं जातं आणि त्यांचं रूपांतर बड्या बॅनर्सच्या साचेबंद मॅस्कॉट्समध्ये केलं जातं. स्पर्धा, पाटर्य़ा, ड्रग्ज, व्यभिचार, स्वैराचार यांच्या या झगमगीत जगात नवोदित कलावंत हरवून जातात. काही तर कायमचे.मात्र, पोकळ सिनेमांचा हा भुसभुशीत डोलारा कोरोनापूर्व काळातच कोसळायला लागला होता. कोरोनाउत्तर काळातल्या समीकरणांमध्ये तो भुईसपाट होण्याचीच शक्यता अधिक आहे. कंटेंट इज द किंग हा या डिजिटल युगाचा नारा आहे. आता काही काळाची चक्रं उलटी फिरून पगारी अभिनेते नेमले जाणार नाहीत; पण स्टार सिस्टमचा झगमगाट जरा फिकुटणार असेल, ग्लॅमरचा पाश सैलावणार असेल, तर ते हिताचंच आहे की सिनेमासृष्टीच्या.

mamnji@gmail.com(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)