शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
10
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
11
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
12
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
13
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
14
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
15
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
16
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

सोला टोपी आणि स्टीलचा डबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 10:49 AM

औद्योगिकीकरणामुळे सगळीकडेच युरोपियन  जीवनशैलीचा प्रभाव दिसू लागला होता.  अनेक घरांत जेवणासाठी टेबल-खुर्ची दिसायला लागली, चुलीच्या जागी किचन प्लॅटफॉर्म आले,  घराघरांत स्टीलचे टिफिन बॉक्स विराजमान झाले, सोला टोपी आणि खाकी गणवेशधारी माणूस  भारतातील रस्त्यांवर दिसू लागला. अशातच महात्मा गांधींनी स्वदेशीची हाक दिली आणि  या चळवळीने भारतात बदलाचे वारे वाहू लागले.

ठळक मुद्देघडणार्‍या, मोडणार्‍या, नव्याने घडणार्‍या,  सतत बदलणार्‍या ‘आकारां’च्या दुनियेतला  विचार आणि शास्र

- हृषिकेश खेडकरडिझाइनच्या आपल्या गोष्टीतला काळ जसा पुढे पुढे सरकतो आहे, तसं जग आता जवळ येऊ पाहतं आहे. जवळ येणार्‍या या जगाचा बहुतांशी भाग हा औद्योगिकीकरणाची मुहूर्तमेढ रोवणार्‍या ब्रिटनच्या अधिपत्याखाली आहे आणि अशातच स्वतंत्न भारताचे बिगूल वाजू लागले आहे. विसाव्या शतकाचा सुरु वातीचा काळ हा मानवी इतिहासातला खूप महत्त्वाचा काळ आहे. पैसा, आधुनिक तंत्नज्ञान आणि जगावर राज्य करण्याची दुर्दम्य इच्छा असणार्‍या ब्रिटनने औद्योगिकीकरणाच्या जोरावर आपल्या वसाहतींमध्ये राजकीय आणि आर्थिक पाळंमुळं या काळात घट्ट करायला सुरु वात केली. अर्थातच भारत यातल्या सगळ्यात मोठय़ा वसाहतींमधली एक वसाहत. भारतात कला हा संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे.  या देशात मौर्य घराण्यापासून ते मुघल साम्राज्यापर्यंत कलाकार आणि कारागीर भारतीय वर्णव्यवस्थेचे घटक मानले जातात. पिढय़ान्पिढय़ा चालत आलेली कलेची ही नानाविध कौशल्ये आजही एकविसाव्या शतकात ग्रामीण भारतात बघायला मिळतात. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटनमध्ये औद्योगिकीकरणाला सुरु वात झाली. उत्पादन आणि व्यवहाराचा वेग इतक्या मोठय़ा प्रमाणात वाढला की युरोप आणि अमेरिका संपूर्ण जगाकडे तयार केलेल्या मालाची बाजारपेठ म्हणून बघू लागल्या. अशातच भारताला दोन गोष्टींमधून या महाकाय तांत्रिक बदलाची ओळख झाली. एक म्हणजे कापूस कताईचे यंत्न आणि दुसरं म्हणजे रेल्वेचे इंजिन. अर्थातच या दोन गोष्टी ब्रिटनमधील कापड गिरण्यांना लागणार्‍या कच्च्या मालाची, म्हणजेच कापसाची ने-आण मोठय़ा प्रमाणात आणि जलद गतीने करता यावी या उद्देशाने भारतात आणल्या गेल्या होत्या. औद्योगिकीकरणाची इतकीच काय ती ओळख भारताला अनेक वर्षं होती. याच काळात इंडस्ट्रियल आर्ट (औद्योगिक कला) म्हणजे काय आणि याचा उत्पादनाशी काय संबंध आहे, याची झलक भारतीयांना बघायला मिळाली.  औद्योगिक उत्पादनासाठी लागणार्‍या यंत्न आणि साहित्याच्या मदतीने आणि मानवी कौशल्याच्या साहाय्याने कारखान्यात वस्तू बनवण्याच्या कलेला इंडस्ट्रियल आर्ट  असे संबोधले गेले. अत्यंत महत्त्वाची व्यापारी केंद्रे असणार्‍या कलकत्ता, मुंबई आणि चेन्नई या तीन शहरांमध्ये ही कला शिकवण्यासाठी मोठी आर्ट कॉलेज तयार करण्यात आली. ब्रिटिश विचारसरणीवर आधारित ही शिक्षणशैली भारतीय कलासंस्कृतीला विचारात न घेता केलेला एक प्रयोग होता. भारतीय कलेला सामावून न घेता केलेला हा प्रयोग त्याची शैक्षणिक उद्दिष्टे पूर्ण करण्यात अपयशी ठरला. परिस्थितीची जाणीव आणि कलेची आस्था असणारे रवींद्रनाथ टागोर आणि आनंद कुमारस्वामी यांनी भारतीय कलेला सामावून घेत एका नवीन शिक्षणशैलीची मुहूर्तमेढ पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन येथे रोवली. चारुकला (उपयोजित कला) आणि करुकला (यांत्रिक कला) अशा दोन विभिन्न अंगांचा समावेश असलेली ही शिक्षण पद्धती भारतीय कलाकार आणि कारागीर यांना औद्योगिकीकरणाच्या प्रवाहात स्वत:चे स्थान निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून बनवली गेली होती. दैनंदिन जीवनातदेखील औद्योगिकीकरणामुळे होणारे बदल आता जाणवू लागले होते. भारतातील सधन कुटुंबांत युरोपियन जीवनशैलीचा प्रभाव दिसू लागला. त्यांची राहाणी , कपडे आणि शिष्टाचारदेखील युरोपियन जीवनशैलीची नक्कल करू पाहत होते. जमिनीवर बसून जेवण करण्याची पद्धत हळूहळू नाहीशी होऊन त्याची जागा आता टेबल आणि खुर्ची घेऊ पाहत होती. घरातली चूल जाऊन, किचन प्लॅटफॉर्म येऊ पाहत होते. गार्डन चेअर, कॅम्प कोट, मच्छरदाणी अशा अनेकविध वस्तू आता भारतीय कुटुंबांमध्ये दिसू लागल्या. सर्वपरिचित असा स्टीलचा टिफिन बॉक्स हीसुद्धा त्यांचीच देण. सोला टोपी आणि खाकी गणवेश परिधान केलेला माणूस आता भारतातील रस्त्यांवर दिसू लागला होता. सांस्कृतिकदृष्ट्या ही बदलणार्‍या भारतीय समाजाची मूल्ये वाटत असली तरी समाजात एक मोठी दरी निर्माण होऊ लागली होती. अशातच स्वातंत्र्य संग्रामाचे रणशिंग पुन्हा एकदा फुंकले गेले. महात्मा गांधींनी स्वदेशी मोहिमेची हाक दिली. या मोहिमेने समाजात एक अनोखी चळवळ निर्माण झाली आणि भारतात बदलाचे वारे वाहू लागले. चरखा, खादीचे कपडे, भारतीय बैठक, कुर्ता, पायजमा, चप्पल अशा वस्तूंमधून स्वातंत्र्यसेनानी ओळखला जाऊ लागला. स्वदेशी चळवळ भारतातील सामाजिक आणि राजकीय सुधारणेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण तर होतीच; पण त्याचबरोबर एका भारतीयाची ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने उचलेले एक यशस्वी पाऊल होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर 1947 साली भारत स्वतंत्न झाला आणि स्वतंत्न भारताचे पहिले प्रधानमंत्नी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या प्रगतीची सूत्ने आपल्या हातात घेतली. जगाच्या नकाशावर भारताला प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने भारतात मोठी धरणे, अणुशक्ती केंद्र, अंतराळ कार्यक्र म यांची आखणी करण्यात आली. अनेक उद्योगधंदे आणि कारखान्यांची निर्मिती करण्यात आली आणि भारतात खर्‍या अर्थाने औद्योगिक क्र ांतीची सुवर्णपहाट झाली. पाश्चिमात्य देशांप्रमाणे मोठे उद्योग भारतात उभारले गेले; पण वर्षानुवर्षे चालत आलेले कला-कौशल्यावर आधारित उद्योगदेखील भारताच्या बहुतांश भागात चालूच राहिले. भारतात रेल्वेचं इंजिन आलं; पण रस्त्यावरची बैलगाडी काही थांबली नाही. संपूर्ण आशिया खंडात मोठी आणि महत्त्वपूर्ण असणारी लघुउद्योग वसाहत आज भारतात आहे. देशाच्या या जडणघडणीच्या काळात नेहरूंनी अमेरिकन डिझायनर चाल्र्स एम्स आणि रे एम्स यांना भारतात बोलावले. इथल्या एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन या दोघांनी एक अहवाल भारत सरकारसमोर मांडला. याच अहवालाची दखल घेत मिल कारखानदार साराभाई कुटुंबीयांच्या प्रयत्नांतून स्वायत्त शैक्षणिकअधिकार असणार्‍या पहिल्या डिझाइन कॉलेजची म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनची स्थापना 1961 साली अहमदाबाद येथे झाली. या संस्थेच्या माध्यमातून भारतीय उद्योगधंद्याला चालना देणारे अनेक प्रयोग भारतीय डिझायनर्सनी केले. महेंद्र पटेल, कुमार व्यास, सुधाकर नाडकर्णी ही काही प्रातिनिधिक नावं इथे नमूद करावीशी वाटतात; ज्यांनी आपल्या देशात डिझाइनच्या नव्या युगाला सुरु वात केली. डिझाइनच्या या युगातली कार्यपद्धती आणि आव्हाने यांची ओळख आपण पुढील लेखात पाहुयात.

hrishikhedkar@gmail.com(लेखक वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)