शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

सेवाव्रती परिचारिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 1:14 AM

आज, रविवार परिचारिका दिन त्यानिमित्ताने रुग्णसेवेचे अखंड व्रत घेतलेल्या परिचारिकांचे रुग्णालयातील स्थान, त्यांचे कार्य याविषयी....

- निशा ऊर्फ पुष्पा शिंदे

आज, रविवार परिचारिका दिन त्यानिमित्ताने रुग्णसेवेचे अखंड व्रत घेतलेल्या परिचारिकांचे रुग्णालयातील स्थान, त्यांचे कार्य याविषयी....पेशंटचे अ‍ॅडमिशन झाल्यापासून डिस्चार्ज होईपर्यंत दिवस-रात्र संपर्कात येते ती व्यक्ती म्हणजेच ‘नर्स’. ज्या दिवशी अ‍ॅडमिशन होते त्या वेळेपासून पेशंट आणि नातेवाईक प्रत्येक अडचणीसाठी सिस्टर हेच नाव उच्चारतात... सिस्टर! पेपरवर नंबर कुठून टाकायचा? कसे जायचे? पेपरला काय काय जोडायचे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सिस्टरना द्यावी लागतात... ती सर्व उत्तरे ती कितीही बिझी असली तरीही अचूक, मार्ग निघणारी, समाधानकारक आणि हसतच द्यावी लागतात... आजाराने वैतागलेला रुग्ण व त्याचे नातेवाईक यांच्यावर चिडणे हे अद्याप तिला जमले नाही व जमणारही नाही... त्यांच्या भावना तिला जपाव्याच लागतात... कारण प्रशिक्षणावेळी तिला या सर्व गोष्टी शिकविल्या जातात... हातातील कामे सोडून तिला अशा हजार प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात... तिच्या त्या प्रत्येक शिफ्टला वॉर्डात एक किंवा दोनच स्टाफ असतात... हात दोन आणि रिमेनिंग भरमसाट़... अ‍ॅडमिशन वेगळे, डिस्चार्ज वेगळे, ट्रान्सफर, इन-आऊट, दामा, अ‍ॅब्सकॉन्ड, डेथ त्यात एमएलसी प्रोसिजर अशी अनेक कामे तिला व्यवस्थितच करणे भाग असते. कितीही ती बिझी असली तरीही... कारण रेकॉर्डिंगसाठी हे सर्व तितकेच महत्त्वाचे असते... रुग्णसेवा करत करत तिला हे सगळे करणे गरजेचे असते...सर्वांत महत्त्वाचे ‘रुग्णसेवा’ करीत असताना डॉक्टरांनी पेपरवर टाकलेल्या सर्व आॅर्डर्स् तिला फॉलो करायच्या असतात. त्या फॉलो करताना सर्वच औषधसाठा, सर्व सामग्री कधी उपलब्ध असते, नसते; परंतु रुग्णसेवेत खंड न पडता तिला ते स्वत: उपलब्ध करून त्या वेळेत ते द्यावेच लागते... कारण पेशंटची ट्रिटमेंट तिला सर्व कामांपेक्षा महत्त्वाची असते... पेशंटचा डोस वेळेत जाणे, वेळेत त्याला हवे ते बघणे त्याला ती जास्त महत्त्व देते... नाही किंवा मी थकले हे शब्द तिला माहीतच नसतात... हो, हो आलेच हा!! येते हा!! एकच मिनीट!! एवढेच तिला माहीत असते... त्यात एखादा पेशंट सीरियस झाला तर तेही हातातील काम टाकून पळत जाऊन ती इमरजन्सी हॅण्डल करते... त्या वेळेत स्वत:कडे लक्ष नसलेली पेशंट सेवेसाठी वाहून गेलेली अशी ती एकनिष्ठ असते...

‘रुग्णसेवा’ व या सर्व गोष्टी करीत असताना... वॉर्ड टायडी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते... कारण स्वच्छता असल्याशिवाय पेशंटला, नातेवाइकांना व स्वत: आपल्याला काम करण्यास सुटसुटीत वाटायला पाहिजे व पेशंटला स्वच्छ व राहण्यास प्रसन्न व त्याचा निम्मा आजार तिथेच बरा झाला पाहिजे यासाठी नीटनेटकेपणा, पेशंट व वॉर्ड स्वच्छता, टायडीनेस, बेडमेकिंग यालाही प्रथम प्राधान्य देते ती... काही बेडरिडन पेशंटची पोझिशन चेंज करणे दर दोन तासाने, सक्शनिंग, फिडिंग, बॅक केअर... कुणाचे ड्रेसिंग करायचे असते... तर कोण व्हेंटीलेटरवर... त्या प्रत्येक पेशंटची स्वच्छता व बेडसोर होऊ नये म्हणून त्यांची काळजी घेणे... हे सर्व नर्सिंग केअर तिला पेशंटला प्रथम द्यावीच लागते... कारण जरी ती टेबल डॉक्युमेंटेशन करीत असेल तरी तिचा सर्व जीव, सर्व लक्ष त्या बेडरिडन, व्हेंटिलेटरवर असलेल्या पेशंटकडेच असते व पेशंटबरोबर नातेवाईक असतील, नसतील तरीदेखील... एक चौफेर नजर ती मधून मधून सर्व पेशंटकडे टाकतच असते... स्वत:ला पेशंट सेवेत विसरलेली अशी ती पेशंट बाबतीत स्मरणिका... कर्तव्यतत्पर...

वॉर्डमध्ये विचारपूस करण्यास येणाऱ्या प्रत्येकाला तिला तोंड द्यायचे असते... तिच्या वरिष्ठांचे राऊंड... त्यासाठी प्रत्येक पेशंट ट्रिटमेंटसहित तोंडपाठच असावा लागतो. मग, रिमेंनिंगचा आकडा कितीही असू देत... कधी कुणाचा राऊंड येईल सांगता येत नाही... मेडिसन असो या सर्जरी... वॉर्डमधील प्रॉब्लेम्ससाठी... रिपेअरिंग... असे अनेक काही... पेशंटला पास वाटणे, डिस्चार्ज होताना ते आठवणीने परत घेणे... त्यात एखादा पास चुकून हरवला तर ती ही भरपायी तिलाच द्यावी लागते... कधी फार्मासिस्ट होऊन, कधी क्लार्क होऊन, तर कधी चतुर्थ श्रेणी होऊन, तर कधी गार्ड होऊन नर्सिंग केअर व्यतिरिक्त हे पण रोल तिला वेळेप्रसंगी व्यवस्थित बजावावे लागतात... पेशंट रखडला जाऊ नये हेच उद्दिष्ट तिच्यासमोर असते... रुग्णसेवेत खंड पडू नये म्हणून त्याला कोणत्याही प्रकारे काही कमी पडू नये म्हणून ती फक्त दिवस-रात्र शिफ्टमध्ये झटत असते.हॉस्पिटलची, वॉर्डची मॅनेजमेंट आमच्यातीलच काही वरिष्ठ भगिनी हॅन्डल करीत असतात... जेणेकरून पेशंट सेवेत बाधा व तुटवडा येऊ नये म्हणून सर्व प्राण ओतून प्रयत्नशील असतात... आम्ही नर्सिंग आॅफिसरपासून वरच्या लेव्हलपर्यंत आमच्या वरिष्ठ भगिनी सर्वांचा एकच उद्देश अखंड रुग्णसेवा या व्यतिरिक्त काही नसतो... ती नर्सच असते... तिच्याशिवाय रुग्ण हा हॉस्पिटल, डॉक्टर्स सर्व सुखसोयी, सुविधा उपलब्ध असूनही अधुरा आहे... ती आणि तिचा पेशंट यामधील नाते वेगळेच असते... मेडिकल प्रोफेशनमध्ये तिची जागा कुणीही घेऊ शकत नाही.(लेखिका सीपीआरमध्ये अधिपरिचारिका आहेत.) 

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर